खानापूर : तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताला कवडीमोल दर देऊन दलाल आणि शेतकऱ्यांची लूट चालवली आहे. भात विक्रीतून उत्पादन खर्चा इतकी ही रक्कम पदरात पडत नसल्याने शेतकरी हवालदार झाला आहे. हमीभाव फाट्यावर ठेवून दलालांकडून मनमानी दराने भात खरेदी सुरू असून शासनाने त्वरित भात खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी केली केली जात आहे.
खानापूर तालुक्यात जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रात भात उत्पादन घेतले जाते त्यामुळे अभिलाष, दोडगा, सोनम, इंद्रायणी, भीम, स*** जया, साईराम, काडी या भातांचा समावेश आहे. गेल्या वर्षी दलाल यानी मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून साठवणूक केली होती. पण ऐनवेळी दर गडगडल्याने आपल्याला नुकसानीचा सामना करावा लागेल असे सांगत नुकसान भरून काढण्यासाठी आता सुगीच्या हंगामात सदर दलाल शेतकऱ्याकडून कमी दरामध्ये भात खरेदी करताना दिसत आहेत. बाजारात तांदळाचे दर स्थिर आहेत. मात्र भाताचे दर फारच कमी झाले आहेत. त्यामुळे चुकीच्या दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या दलालांकडून भात खरेदी अल्प दरामध्ये सुरू आहे यावर्षी इंद्रायणी भात 2300 दोडगा 2280 भीम 2280 साळी 2150 अभिलाष 2100 सोनम 2000 साईराम 2200 जया 1800 तर काडी 1800 अशा पद्धतीने भाताचे दर सुरू आहेत. तेच मागील वर्षी अभिलाष जवळपास 2600 रुपये तोडगा 2700 ,भीम 2500 रुपये इंद्रायणी 3500 तर सोनम 27 00 रुपये दराने खरेदी केला जात होता. पण या वर्षीचा फारच कमी झाला आहे. यावर्षीच्या ऐन सुगीच्या हंगामात केवळ 2100 रुपये ते 2250 इतक्या दराने भात खरेदी केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने भात खरेदी केंद्र करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव व खानापूर येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत अशी सूचना केली आहे. राज्य कृषी उत्पादन खरेदी महामंडळाची बैठक घेऊन या बैठकीत यावर्षीच्या सुगीच्या हंगामाचा आढावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला व खानापूर व बेळगाव या ठिकाणी प्रमाणात भात उत्पादन होते यासाठी एपीएमसी मध्ये भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे व किमान 2300 ते 2320 पर्यंत भात खरेदी दर राखावा अशी सूचना केली आहे. यासाठी टीपीएमसी मध्ये 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी आपले नावे नोंदणी गरजेचे असल्याचेही यावेळी सूचित करण्यात आले आहे. परंतु एपीएमसी मधील या खरेदी विक्रीला प्रतिसाद मिळेल का हा प्रश्न निरुत्तरित आहे.