खानापूर: तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वासाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली दिली आहे . ग्रामपंचायतचे विद्यमान अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात विद्यमान कमिटीच्या सात सदस्यांनी अविश्वास दाखल केला होता. प्रांताधिकार्यांच्या निर्देशनानुसार येत्या 16 नोव्हेंबर रोजी सदर अविश्वासावर बैठक बोलावण्यात आली होती. यानुसार महाबळेश्वर पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव हा नियमबाह्य असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. याची 14 तारखेला सुनावणी झाली. या सुनावणी नुसार उच्च न्यायालयाने या 16 तारखेच्या अविश्वास ठराव बैठकीवर स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात अविश्वास दाखल केलेल्या सदस्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
महाबळेश्वर पाटील अध्यक्ष झाल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यात या ठिकाणी अनेक विकास कामे राबवत असताना ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका तथा गटारी बांधकामातील दगडांचा वाद असे अनेक विषय ठेवून विद्यमान ग्रामपंचायत समितीच्या 10 पैकी सात सदस्यांनी त्यांच्या विरोधात ्रांताधिकार्यांच्याकडे ठराव दाखल केला होता. परंतु आता तो न्यायालयाने या अविश्वास ठरावाच्या बैठकीवर स्थगिती देऊन एक प्रकारे महाबळेश्वर पाटील यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच महाबळेश्वर पाटील यांचा पुढील कार्यकाळ केवळ आठ महिन्याचा असल्याकारणाने दाखल केलेला हा अविश्वास ठराव पुढील न्यायालयाच्या तारखांना निकालात येईल का. हा प्रश्न निरुत्तरित आहे.