खानापूर: तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या वतीने खानापूर तालुक्यात पंचमी योजनांची माहिती तथा जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना भेटीगाठी करून तेथील समस्या, योजनातील त्रुटी तथा पक्ष संघटनेच्या संदर्भात कार्यकर्त्यांची जोडणी असे विविध कार्यक्रम खानापुर तालुका ब्लॉक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष अधिवक्ते ईश्वर घाडी सह पदाधिकाऱ्यांनी सुरू ठेवले आहेत. सोमवारी सावरगाळी, शिंदोळी येथे अभियान राबवण्यात आले. या ठिकाणी नागरिकांच्या गाठी घेतल्या. व त्याची पडताळणी करून आवश्यक त्रुटी दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. महिला भगिनी तसाच वयोवृद्ध नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
एच एल जमिनी संदर्भात चर्चा:
सावरगाळी येथे येथील जमिनीत येथील अनेक नागरिकांनी घरे बांधली आहेत. परंतु त्यांना अधिकृत हकपत्र देण्यात आले असल्याकारणाने येथील नागरिकांची मोठी अडचण आहे. प्रत्येक वेळी येथील रहिवासी लोकांना न्याय दिला जात नसल्याने आम्हाला हक्काचे घर द्या अशी मागणी येथील नागरिकांनी केली. दरम्यान खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी एआय सी सी सचिव व माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्याशी चर्चा करून तसेच अक्रम सक्रम समितीची बैठक बोलावून या संदर्भात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तथा योग्य मार्ग काढून येतील जनतेला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू अशी यावेळी सांगितले. दरम्यान या भागात दरवर्षी हत्ती पासून होणारे नुकसान हे मोठे आहे. त्यासाठी त्या हत्तीचा बंदोबस्त करावा यासाठी माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी वन मंत्र्यांची भेट घेऊन सूचना केली आहे. असे त्यांनी सांगितले यावेळी शिंदोळी गावातील नागरिकांच्याही समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासमवेत ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजेश पाटील, शांताराम गुरव प्रमोद गुरव, खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियन चे अध्यक्ष व भूलवाद मंडळाचे सदस्य विनायक मुतगेकर आधी उपस्थित होते.