खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले दिन दलिततासह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. काँग्रेस पक्ष हा जातीयवादी पक्ष नसून सर्व सामान्यांचा दिन दलितांचा पक्ष आहे. या पक्षाने केलेल्या कामाचा मागील पाडावा मागे ठेवून केवळ जातीयतेच्या नावावर राजकारण करण्याचे काम सध्याचे भाजप नेते करत आहेत. पण अशा ढोंगी राजकारणा विरोधात आपण लढा उभारून काँग्रेसची तत्त्वे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. पक्षाच्या वतीने या भागातील गरजू विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील असे आश्वासन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस ग्रामीण चे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी व्यक्त केले. गुरुवारी जांबोटी येथील वनदेवी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कसरलेकर होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत संचालक पुंडलिक पाटील यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना खानापूर तालुका कॉग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की, अध्यक्षपदाची संधी माझ्या नेत्या व सर्वस्वी माजी आमदार व आखील भारतीय कॉग्रेस कमिटीच्या कार्यदर्शी व गोवा इनचार्ज डॉ. अंजलीताई निंबाळकर यानी दिली. त्यामुळे त्यांचे मी शतषा ऋणी असल्याचे सांगीतले. यावेळी अक्रम सक्रम समितीच्या नामनिर्देशक सदस्या दीपा दिपक कवठणकर यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना लक्ष्मण कसरलेकर म्हणाले, खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने एक उमद्या व्यक्तिमत्त्वावर पक्षाची जबाबदारी दिली या जबाबदारीला अनुसरून व इतर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते तालुक्याच्या विकासासाठी व गोरगरिबांच्या न्यायासाठी नक्कीच प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास त्यामुळे आपण त्यांच्या सहकार्यातून जांबोटी भागाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.यावेळी कॉग्रेसचे नेते महादेव घाडी, राजू पाटील, दिपक कवठणकर, वनदेवी सोसायटीचे संचालक पुंडलिक पाटील, दर्शन पाटील, परशराम गावडे, आप्पाणा गावडे, बसवंत नाईक, मिलीग्रीस मेन्डोसा व इतर संचालक मंडळ उपस्थित होते. संचालक पुंडलिक पाटील यानीआभार मानले.