
खानापूर:
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते माजी अध्यक्ष, क्षत्रिय मराठा परिषदेचे माजी अध्यक्ष, तथा समृद्धी सोसायटीचे संस्थापक संजय जयवंत कुबल यांचा 51 वा वाढदिवस आज सहा नोव्हेंबर रोजी उत्साह साजरा करण्यात खानापूर येथील शासकीय विश्रामधामात खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक व मित्रपरिवार आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री संजय कुबल हे गेल्या 30 वर्षापासून भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. भाजपच्या संघटनात्मक तथा पक्ष मजबुतीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. खानापूर तालुक्यात अनेकांना आमदार करण्यात त्यांचा मौलाचा मोठा आहे. एक मुरब्बी निस्वार्थी, तथा युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या 51 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकानी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख कोचेरी, बीजेपी युवा युवा नेते किशोर हेब्ब्बाळकर, सुनील मडीमनी, जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, माजी सभापती सयाजी पाटील, भाजपा कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, मल्लाप्पा मारीहाळ, माजी प्रधान कार्यदर्शी मारुती पाटिल ,भाजप लोंढा विभाग उपाध्यक्ष बाबा देसाई, सदानंद होसुरकर, गजानन पाटील, दत्ता पाटील, सुनील नाईक, अजित पाटिल, सुनील देसाई, प्रशांत लकेबैलकर, श्रीपाद शिवोलकर, जोतिबा अल्लोलकर आधी उपस्थित होते.