खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
स्नेहांचे ऋणानुबंध हे कायम जतन करून ठेवणे इतकी मोठी संपत्ती या जगात कोणती नाही. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी या शाळेच्या जडणघडणीमध्ये दिलेले योगदान. शाळेतून कच्च्या मातीचे गोळे निर्माण होऊन आज उच्चस्त पदावर अनेक जण कार्य करत राहणारे सवंगडी मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा आनंद द्विगुणीत असतो. अशाच पद्धतीने गोधळी सह्याद्री हायस्कूलच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांचा वारंवार होणारा स्नेह मेळावा ही शाळेला देणारी ऊर्जा व एकमेकातील स्नेहाचे ऋणानुबंध जागृत करणारी मोठी संपत्ती असल्याचे विचार माजी विद्यार्थी व पुणे स्थित उद्योजक शिवाजी जळकेकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित सह्याद्री हायस्कूल गोधोळी तालुका खानापूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष संतोष हनुमंत कदम होते.
प्रारंभी हायस्कूलच्या विद्यार्थिनी ईशस्तवन स्वागतगीत सादर केले. द्वीपप्रज्वलन श्री परशराम नंद्याळकर निवृत्त बँक मॅनेजर SBI, श्री. गिरीश कदम, श्री. शिवाजी जळगेकर, श्री. संतोष कदम , श्री. मोहन बांदेकर , श्री. अर्जुन मीटगार श्री. परशुराम घोटगाळकर यांच्या उपस्थितीत झाला.
महात्मा ज्योतिबा फुले फोटो पूजन श्री.शिवाजी जळगेकर व सावित्रीबाई फुले फोटो पूजन श्री.गिरीश कदम यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक श्री नामदेव अप्पाजी पाटील सर यांनी केले. श्री.प्रभाकर जांबोटकर , श्री. परशराम घोटगाळकर, श्री. परशराम नंघाळकर, श्री.गिरीश कदम, श्री.शिवाजी जळगेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावरून शाळेच्या प्रगती संदर्भात व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यासंदर्भात अनेकांनी विचार मांडले. शाळा कमिटीचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संतोष हनुमंत कदम यांनी आपल्या भाषणातून स्नेह मेळावे वरचेवर व्हावेत व हायस्कूलचा विकास करावा. असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एच एस करंबळकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.बी जे पाटील यांनी मानले.