खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गेल्या दोन महिन्यापासून खानापूर तालुका दौरा करत असलेल्या त्या टस्कराने गेल्या दोन-तीन दिवसापासून कारलगा डोंगरी माळ, परिसरात आपले ठाण मांडले आहे. जंगल सोडून उघड्या माळावर फिरत असलेल्या त्या हत्तीला बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याने तातडीने पावली उचलावीत. असे खडेबोल तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.
गेल्या दोन तीन दिवसापासून चापगाव, कारलगा परिसरातील शिवारात सदर हत्ती विसावला आहे. इतक्या उघड्या माळावर हत्ती असूनही वन काते चिडीचूप का ? असा प्रश्न सर्वसामान नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी सदर हत्ती अबनाळी, कांजळे, कोंगळा परिसरात वावरत होता. उन्हाळ्यात वांयगान पिकांची मोठी हानी केली होती. त्यामुळे या भागातील नागरिक हतबल झाला होता. या भागातील नागरिकांनी वन खात्याकडे आंदोलने केली निवेदने दिली. पण वन खाते या तस्कराला बंदिस्त करण्यास हतबल ठरले. त्यावेळी जंगलात हत्ती असल्याने पकडण्यासाठी किंवा त्या हत्तीला बंदिस्त करण्यासाठी सोयीचे नसल्याचे कारण सांगून वन खात्याने हात वर केले होते. पण आता तोच हत्ती सावरगाळी भागातून हालसाल ,हतरवाड जंगलात पोहोचून पुन्हा आपला मोर्चा बेकवाड हाडलगा मार्गे चापगाव भागात वळवला आहे. गेल्या आठ दिवसापासून चापगाव भागात ठाण मांडलेल्या हत्तीला बंदोबस्त करण्याची मागणी केली जात असली तरी वन खाते फक्त बघायची भूमिका घेत आहेत. या संदर्भात शनिवारी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, तसेच तालुक्यातील पत्रकारांनी सदर बाब आमदारांच्या निदर्शनाला आणून दिली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुका वन संरक्षण अधिकारी यांना संपर्क साधला. विभागीय वनाधिकारी श्रीकांत पाटील यांना बोलावून हत्तीच्या बंदोबस्ता संदर्भात तातडीने पावले उचलावीत अशी सक्त सूचना केलीआहे.
वनखाते धोक्याची वाट पाहतेय का?
सदर हत्ती कारलगा, चापगाव परिसरातील डोंगरी भागात वावरत आहे. हत्ती शांत आहे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा कोणावर हल्ला करत नाही. मात्र त्याचा गैरफायदा घेत या भागातील अनेक युवक शेतकरी वर्ग त्या हत्ती जवळ जाऊन त्याची छेड काढत आहेत. सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा उल्लडबाजी करणाऱ्या लोकांच्या वरही वन खाते दुर्लक्षित आहे एखाद्या वेळी त्या हत्तीने पिसाळून हल्ला करण्यास सुरू झाला तर ते कितीला पडेल असा प्रश्नही आमदार विठ्ठल हलवेकर यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला. संभाव्य धोका पाहता तातडीने त्या हत्तीला बंदिस्त करून जंगलामध्ये सोडण्याची व्यवस्था वन खात्याने करावी अशी सक्त सूचना यावेळी केली आहे.