खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
१९५६ पासून अन्यायाने दबलेला सीमा भाग आजही तडफडत आहे. सीमा भाग महाराष्ट्र जावा यासाठी अनेक लढे शांततेच्या मार्गाने झाले. न्यायालयीन दरवाजा ठोटवण्यात आला. पण या प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी आवश्यक ताकद कमी पडत आहे. सीमा भागातील नागरिक आजही महाराष्ट्रात जाण्यासाठी तडफडत आहेत. पण यासाठी महाराष्ट्र सरकार असती नसल्याने हा प्रश्न मिळाला आहे. प्रश्नाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने हातबल होऊन चालणार नाही. पण यासाठी जोपर्यंत रक्तात प्रश्नाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने हातबल होऊन चालणार नाही. पण यासाठी जोपर्यंत रक्तात प्रश्नाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने हातबल होऊन चालणार नाही. पण यासाठी जोपर्यंत मराठी माणसाच्या नसानसात मराठी भाषेचे रक्त आहे. तोपर्यंत सीमा भरण्याची चळवळ ही कायम जिवंत ठेवली पाहिजे. सीमा भागातील महाराष्ट्रातील संघटना कायम मजबूत ठेवून या लढ्यासाठी वज्रमूठ दाखवावी असे विचार शुक्रवारी शिवस्मारकात आयोजित एक नोव्हेंबर क***** दिनानिमित्त आयोजित बैठकीत करण्यात आले. व या अन्यायाविरोधात ठराव संमत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
प्रारंभी संघटनेचे सचिव आबासाहेब दळवी यांनी उपस्थित आमचे स्वागत संदर्भात प्रस्तावना मांडली. त्यानंतर अनेकानी विचार मांडले. यावेळी माजी सभापती मारुती परमेकर, निरंजन सरदेसाई, बाळासाहेब शेलार, मुरलीधर पाटील, विलास बेळगावकर, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटिल, जगन्नाथ बिर्जे, शंकर गावडा, पावले गुरुजी, जयराम देसाई, हनुमंत जगताप , आदींची भाषणे झाली. बैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात आशेचा किरण केवळ शरद पवार उद्धव ठाकरे ! महाराष्ट्रात सर्व राष्ट्रीय नेते मंडळींना सीमा प्रश्नसंदर्भात असती नाही. केवळ सीमा भागाकार आंदोलने करून चालणार नाहीत यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलून आवश्यक भूमिका घेतली पाहिजे. या प्रश्नासाठी केवळ माननीय शरद पवार शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना तेवढीच याची कळ आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीनंतर सीमा भागातील एका शिष्टमंडळाने या नेत्यांना भेटून काय तो अंतरीम तोडगा निघेल याचा प्रयत्न करूया असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना निरंजन सरदेसाई म्हणाले, समिती समिती म्हणून एकतर्फी विचार नेत्यांनी न करता जन माणसाचे विचार आत्मसात करून नवीन युवा पिढीला यामध्ये समाविष्ट करून देणे गरजेचे आहे. समितीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेली कार्यपणा प्रणाली ही संघटनात्मक नसल्याने मराठी म्हणून समिती पासून दूर जात आहे. याचा सारासार विचार होऊन नेत्यांनी कार्यतत्पर व्हावे असेही त्यांनी सुचवात केले. यावेळी अनेकांची निषेधपर भाषणे झाली.