खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर येथील सुप्रसिद्ध वकील अमर कराडे वय 55 यांचे अल्पशा आजाराने बुधवार दीं 30 रोजी सायंकाळी 3 च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
वकील अमर कराडे हे खानापूर बार असोसिएशनचे एक क्रियाशील सदस्य होते. 1993 पासून ते एक सुप्रसिद्ध वकील म्हणून परिचित होते. गेल्या काही वर्षापासून ते अल्पशा आजाराने त्रासात होते. त्यांचे आज सायंकाळी निधन झाले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर खानापूर येथील स्मशानभूमीत संस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाबद्दल खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी दुःखवटा व्यक्त केला आहे.