खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातून जाणाऱ्या बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी क्रॉस ते लोंढा दरम्यान कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने या भागातील कोणती वळणे व कोणते गाव कोणत्या ठिकाणी आहे हे वाहनधारकांना कळणे कठीण झाले आहे. करिता महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तातडीने होणकल क्रॉस पासून पुढे गंगवाळी, शिंदोळी, नायकोल माणिकवाडी, तीओली वाडा, सावरगाळी, गुंजी व त्यापुढे अनेक गावे या महामार्गाला जोडली आहेत. परंतु या गावांच्या जोड रस्त्यालयात एकही नाम फलक नसल्याने सुसाट येणाऱ्या बस चालकांना गावचा बस थांबा कोठे आहे हे कळणे कठीण झाले आहे. त्यामुळे न थांबता अनेक बसेस सुसाट जात आहेत शिवाय वाहनधारकांना कोणते गाव कोठे आहे हे कळणे मुश्किल झाले आहे.
बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी बेळगाव – खानापूर पर्यंत महामार्ग प्राधिकरणाने नामफलक बसवले आहेत, गणेबैल येथे टोल प्लाजा सुरू केला आहे. मात्र सुविधा अपुरे आहेत. खानापूरच्या पुढे फोन कर क्रॉस पासून पुढे लोंढा पर्यंत कोणत्याही ठिकाणी गावांची नावे असलेले नामफलक बसवण्यात आले नाहीत. या महामार्गाचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम जवळजवळ पूर्णत्वाला आले असले तरी जोड रस्त्याची तसेच रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांची कामे अधुरी आहेत, तीही तातडीने पूर्ण करावीत व या रस्त्यावर नाम फलक बसवण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
विद्यार्थ्यांचे होताहेत हाल! शालेय वेळेत बसेस सोडा.
बेळगाव – पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी खानापूर ते गुंजी पर्यंत जवळपास पाच ते सहा गावे येतात. परंतु येथील शाळकरी मुलांना खानापूरला शाळेला येण्यासाठी वेळेत बस नाहीत. या मार्गावर बसेस सोडण्यात आले आहेत. परंतु नियमित बसेस नसल्याने येथील शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक वेळा वर्ग चुकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यासाठी या मार्गावर शालेय वेळेत बसेस सुविधा पुरविण्यात याव्या अशी सूचना खानापूर बस आगार प्रमुख संतोष यांना केली. मंगळवारी तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी शिंदोळी गंगवाळी आधी गावांना आपला संपर्क दौरा केला. यावेळी रस्त्यावर थांबलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी समस्या सांगितली . यावेळी तातडीने बस आगार प्रमुखांना नियमित बसेस सुरू करण्याची त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.