खानापूर लाईव्ह न्युज :
खानापूरातील गणेशनगर वसाहतीतील रहिवाशांच्यावतीने खानापूर तालुका ग्रामीण कॉग्रेस ब्लॉक अध्यक्ष ईश्वर घाडी याचा नुकताच सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका डॉक्टरअसोसिएशनचे अध्यक्ष डॉ.डी.ई. नाडगौडा होते.
प्रारंभी संजय चौगुले यानी प्रास्ताविक स्वागत केले. गणेशनगरच्या रहिवाशीनी अँड.ईश्वर घाडी खानापूर तालुका ग्रामीण कॉग्रेस ब्लॉक अध्यक्ष यांचा .डॉ.डी ई नाडगौडा याच्याहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना खानापूर तालुका ग्रामीण कॉग्रेस ब्लॉक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की, हा सत्कार माझा नसुन समस्त गणेशनगर वसाहतीतील नागरीकांचा सत्कार आहे. कर्नाटक काँग्रेस पक्षाने खानापूर तालुका ग्रामीण अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. हे माझे भाग्य समजतो. आमच्या नेत्या व माजी आमदार, ए.आय.सी. सी. प्रधान कार्यदर्शी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी तालुक्याच्या विकासाबरोबर पक्ष बांधणीसाठी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे त्याचे मी प्रामाणिकपणे कार्य करत आहे . काँग्रेस सरकारच्या माध्यमातुन तालुक्यात रस्ते, गटारी, पाणी आदी सुविद्या गणेशनगरात चालु आहेत. उर्वरीत सुविधा आर नेत्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार्यास मागे पडणार नाही. अशी ग्वाही दिली. माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या आमदारकाळात गणेशनगर कॉलनीचे उदघाटन केले. याचा गणेशनगर वासीयाना सार्थ अभिमान आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना गणेश कॉलनीतील प्रमुख व तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नाडगौडा यांनी अधिवक्ते ईश्वर घाडी एक सृजनशील व्यक्तिमत्व आहे. समाजाच्या समस्याची जाणीव व त्याचे निवारण करण्याची ताकद त्यांच्यात असल्याने पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ती ते नक्कीच पार करतील. यात शंका नाही. असे सांगून त्यांचा गौरव केला.
यावेळी डॉ. एन एल कदम, महेश कदम, विनोद कदम, महाराष्ट्र बँक कर्मचारी गणपत मोटेकर, सौ. अनिता मोटेकर, सौ. पार्वती घाडी, प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा, संजय चौगुले,, सौ., सुवर्णा कदम, डॉ. मिनल कदम, डॉ. पुनम कदम, राजू कदम, प्रशांत ईरोशी, अंकिता पाटील, निलेश पाटील, अश्विनी ईरोशी, प्रशांत ईरोशी, राष्ट्रीय बॅटमिटन पटू यशवर्धन नाडगौडा, अनिकेत चौगुले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संजय चौगुले यानी मानले .