खानापूर :
खानापूर-जांबोटी मार्गावरील शिवाजीनगर रेल्वे पुलाजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत शंकर धाकलू गुरव (35) रा. रामगुरवाडी ता. खानापूर हा ठार झाला. शुक्रवारी सायंकाळी समोरासमोर तू सेकींची धडक झाली. त्याच्या दुचाकीवर मागे बसलेले त्यांचे काका रवळू नारायण गुरव (55) रा. रामगुरवाडी व समोरील दुचाकीवरील अमोल खोबान्ना पाखरे (27) रा. नागुर्डा ता. खानापूर हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने बेळगाव येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. खानापूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.