IMG-20241023-WA0075

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :

खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने कणकुंभी येथे एक दिवशीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार शनिवारी खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना सरकारी हॉस्पिटल खानापूर व सरकारी हॉस्पिटल बेळगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र, कणकुंबी व गोल्याळी ग्रामपंचायत च्या पुढाकाराने आयोजित या आरोग्य तपासणी शिबिरात 400 हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजाराम लक्ष्मण गावडे कणकुंबी हे होते. श्री व्ही एम बनोशी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, डॉक्टर महेश किडसनवर आरोग्य अधिकारी, प्रमुख पाहुणे श्री विश्वनाथ डिचोलकर श्री हनुमान सोसायटी ओलमनी, श्री विलास बेळगावकर जांबोटी सोसायटी अध्यक्ष, डॉक्टर श्री बंडोपंत पाटील कणकुंबी, श्री अरुण नाईक, श्री कृष्णा गावडे आणि श्री डी एम भोसले ज्येष्ठ नागरिक संघटना उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर विराजमान होते
प्रथम कणकुंबी माऊली हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी ईश्वस्तवन
स्वागत गीत गाईले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री सी एस पवार जनरल सेक्रेटरी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार श्री एम जी बेनकटी व श्री विठ्ठल वेताळ संघटनेचे संयोजक यांनी केले. व्यासपीठावरील सर्वांना शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एल डी पाटील ऑर्गनाइज सेक्रेटरी यांनी केले.
ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला. 90 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असणाऱ्या श्री शिवाजी नागेश दळवी व लखन शेठ वाडेकर कणकुंबी यांचा जीवन गौरव म्हणून सर्व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रबोधनात्मक व गौरवपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर महेश किडसन्नवर यांनी खानापूर तालुक्यांच्या विविध ठिकाणी शिबिरे झालेली व होणारी याबद्दल विशेष माहिती व सातत्याने ज्येष्ठ नागरिकांच्या साठी आरोग्य सेवा आणि आयुष्मान भारत अभियान मार्फत मिळणाऱ्या सुविधा आपण मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. श्री विलास बेळगावकर जांबोटी सोसायटी अध्यक्ष यांनी तालुक्यासाठी मी सातत्याने सेवा व सहकार देण्यास तयार आहे व या कार्यक्रमाचे दुपारचे भोजन पाहुणे आणि शिबिरार्थी यांच्यासाठी सेवास्वरूपी देणगी देऊन सहकार्य केले. श्री विश्वनाथ डीचोलकर हनुमान सोसायटी अध्यक्ष यांनी कार्यक्रमांमध्ये स्वागत समारंभ व सत्कार समारंभ यासाठी शाल श्रीफळ देणगी देऊन कार्यक्रमास सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिक संघटना सातत्याने व जिद्दीने दुर्गम भागातील जेष्ठाकरिता कार्य करत आहे हे कार्य आमच्या तालुक्याला गौरव पूर्ण आहे असे उद्गार संबोधन केले. श्री व्ही एम बनोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. 2018 पासून आज पर्यंत अनेक कार्यक्रम व उपक्रम नियोजित करून ज्येष्ठ नागरिक आणि या कुटुंबाच्या प्रगती करिता व समस्या निवारणकरिता आपल्या संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आपल्या विभागामध्ये कार्य करत आहेत हे आमच्या तालुक्याचे भाग्य आहे आणि सर्वांचे सहकार्य लाभत आहे असेच समाजकार्य सर्व मिळून करूयात व सर्वांची आरोग्य समस्या निवारण करून संघटितपणे तालुक्याचा विकास करणेस आम्ही प्रयत्न करूया आणि यशस्वी होऊ या असे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बंडोपंत पाटील आणि प्रमुख पाहुणे यांचे यांचे विचार प्रबोधन झाले आभार प्रदर्शन श्री उमाकांत वाघधरे यांनी केले आणि कणकुंबी ग्रामपंचायत यांचेमार्फत समारोप करण्यात आला
हा कार्यक्रम सफल आणि संपन्न होण्यासाठी ग्रामपंचायत कणकुंबी पारवाड आमटे आणि गोल्याळी अध्यक्ष उपाध्यक्ष व सभासद यांचे बहुमोलाचे योगदान लाभले ग्रामपंचायत कणकुंबी यांनी या कार्यक्रमाचा अल्पोपहार व चहापान सर्वांसाठी स्वखर्चाने योगदान दिले
या कार्यक्रमांमध्ये विशेष तज्ञ डॉक्टर श्री पै आर बी एस के बेळगाव डॉक्टर प्रदीप डेंटल स्पेशालिस्ट नंदगड , डॉक्टर रतन कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांची सर्व टीम यांनी सेवा बजावली डोळ्यांचे डॉक्टर श्री भीमगौडा डॉक्टर सीमांना टी बी तपासणी सेवा केली जांबोटी आरोग्य केंद्र नर्स यांनी शुगर बीपी तपासणी केली ककेरी डॉक्टर व नर्स यांनी जनरल आजार व स्त्रियांचे आजार यांची सेवा बजावीली
या शिबिरामध्ये 139 चष्मे फ्री देण्यात आले 80 पेक्षा अधिक लोकांचे आयुष्मान भारत कार्ड बनविले 40 पेक्षा अधिक दंत चिकित्सा व उपचार करण्यात आले 30 पेक्षा अधिक लोकांची टीबी तपासणी करण्यात आली 200 पेक्षा अधिक लोकांची इतर आजार व औषधोपचार करण्यात आले 30 पेक्षा अधिक स्त्रियांची तपासणी करून मार्गदर्शन व औषधोपचार देण्यात आले एकूण 430 पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला
या कार्यक्रमासाठी श्री माऊली मंदिर विश्वस्त कमिटी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले सभागृह भोजनगृह आणि पाण्याची सोय स्वच्छता आधी सेवा बजाविली
या कार्यक्रमामध्ये अनेकांनी आपली उपस्थिती सहकार्य व सहभाग दाखविला कणकुंबी पंच मंडळ संघ संस्था पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या विभागाचे निरीक्षक श्री पांडुरंग डिचोलकर श्री महादेव साबळे श्री मल्लू चव्हाण श्री सावंत सर श्री जयसिंग पाटील श्री जिगजीनी श्री निलजगी श्री प्रकाश काद्रोरोळी श्री व्ही एन पाटील श्री महादेव पाटील श्री कुट्रेसर श्री रामा डवरी श्रीमती संजना कोरवी श्रीमती सोनाली गावडे श्रीमती प्रभावती चोर्लेकर श्री शिवाजी कवळे श्री एस एच गुरव श्री संजू चव्हाण, सुनील चिकुळकर आणि साथी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उदात्त हेतू परिश्रम नियोजन आणि संयोजनातून हा कार्यक्रम उस्फूर्त पणे संपन्न झाला.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us