- वयाने जरी मोठ असलं, तरी मनाने मात्र लहान असतं. दोन पिढ्यांमध्ये अंतर म्हणजे आजोबा आणि नातू असत.. या उक्तीप्रमाणे जीवन हे बालपण ते म्हातारपण पर्यंत चालणारे आयुष्य आहे. पण उभ्या आयुष्यात आपण काय कमावलं, काय गमावलं याचं गणित होणं गरजेचं ठरतं . बालपणापासून जीवन जगत असताना येणारे अनेक चढ उतार पहात आपल्या आयुष्याची दोरी विनता विनता अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. मनुष्याचा जन्मदिन हा कदाचित आपल्या आयुष्यातील आठवणीचा ठेवा ठरतो. पण आपल्या जन्मदिनाच्या तारखे आपल्या वंशाचा एक दिवा जेव्हा प्रगटतो. तेव्हा आनंदही द्विगुणीत होतो. अशाच पद्धतीने खानापूर तालुक्यातील डिगेगाळी गावचे प्रतिष्ठित नागरिक खानापूर तालुका राशन दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमान के. आर. देसाई उर्फ कृष्णराव रामचंद्रराव देसाई यांचाआज 15 ऑक्टोंबर जन्मदिन आहे. याच जन्मदिनी त्यांच्या नातवाचा जन्म झाला. त्यामुळे आपल्या वयाच्या 66 व्या वाढदिवस नातवाच्या पहिल्या वाढदिनाच्या निमित्ताने 15 ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांच्या स्व- गावी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकटदिनी के.आर.देसाई यांना अभिष्टचिंतन.
श्रीकृष्णराव देसाई हे डिगेगाळी ता. खानापूर येथील एक प्रतिष्ठित नागरिक होय . त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1959 मध्ये झाला. येथील देसाई घराणे तसे सदन, पण त्याकाळच्या परिस्थितीत शिक्षणाची गंभीर परिस्थिती असतानाही त्यावर मात करत जवळच्या कापोली येथील प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शाळेला खानापूर इथपर्यंत यावे लागले. नंतर कॉलेज शिक्षणासाठी त्यांना बेळगाव जीएसएस गाठावे लागले. त्या काळातील शिक्षणाला विशेष महत्त्व होते. म्हणून अंगी शिक्षणाची जिद्द व चिकाटी असल्यामुळे त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील एक प्रसिद्ध फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे त्यांचा दरारा कायम असायचा. वडील स्वर्गीय रामचंद्रराव बळवंतराव देसाई एक नामांकित व्यक्तिमत्व. भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याच्या उभारणीच्या काळात त्यांचे योगदान मोठे होते. या कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत त्यांनी कारखाना उभारणीसाठी शेअर्स जमा करण्यात मोठा वाटा उचलला. त्या काळात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कृष्णराव देसाई यांनीही या कार्यात उडी घेतली होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहिले. गावांमध्ये एक राशन दुकानदार उभारून समाजसेवेचा वेळ हाती घेतला. आज या राशन दुकानाबरोबर त्यांनी खानापूर तालुक्याच्या राशन दुकान संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन यशस्वीरित्या पेलले आहे. समाज सेवेबरोबर येथील शाळा व्यवस्थापन कमिटीवरही पाच ते सहा वर्षे त्यांनी काम करून शाळेच्या उन्नतीसाठीही मोठा हातभार लावला. त्यामुळे त्यांच्या नावाला प्रतिष्ठितता आहे. मोठेपणाची आस व खोटेपणाचे देखावे करण्यात त्यांनी कधीच सारश दाखवली नाही. समाजसेवेसाठी ते कायम तत्पर राहिले आहेत. दी.15 रोजी त्यांचा 66 वा वाढदिवस आहे. यानिमित्त कुटुंबीयांनी त्यांच्या जीवनातील चढ उताराचा अनुभव घेत त्यांच्या उर्वरित आयुष्याला ऊर्जा व प्रेरणा देण्यासाठी एक छोटी खाणी कार्यक्रम करून वाढदिवसाचे अवचित साधिले आहे. योगायोगाने 15 ऑक्टोंबर 2023 हा त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांचा मुलगा अर्थात नातू राजवीर यांचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे आजोबाच्या 66 व्या वाढदिवस त्यांच्या नातवाचाही पहिला वाढदिवस एकत्रित साजरा करण्याचा द्विगणित वेगळाच असतो. अशा या व्यक्तिमत्त्वास जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…..!
श्री महादेव दळवी.
अध्यक्ष, तालुका राशन दुकानदार संघटना.