खानापूर प्रतिनिधी:
कर्नाटक राज्य कार्मिक खात्याच्या कर्नाटक बांधकाम आणि इतर निर्माण कार्मिक कल्याण मंडळ यांच्या वतीने खानापूर तालुक्यातील जवळपास 434 कामगारांना विविध स्वरूपाचे कामगार कीट आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सदर किडचे वितरण प्रसंगी खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी विलास राज कार्मिक खात्याच्या बैलहोंगल विभागीय तालुका निरीक्षक दीपा बंडी, कार्मिक खात्याचे डी. ओ. मंजुनाथ वाल्मिकी, खानापूर तालुका धार्मिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, कृषीपतीनचे संचालक शंकर पाटील उपस्थित होते.
खानापूर येथील तालुका पंचायत मध्ये गवंडी कामगार , प्लंबर मेस्त्री , इलेक्ट्रिक मेस्त्री,फरशी फिटिंग असे जवळपास 30,000 हून अधिक नोंदणीकृत कामगार आहेत. या नोंदणीकृत कामगारांना दरवर्षी कार्मीक खात्याच्या वतीने विविध स्वरूपाचे किट अर्थसहाय्य दिले जाते. 2024 25 या आर्थिक वर्षातील पहिल्या खानापूर तालुक्यात 434 विविध स्वरूपाचे किट आले आहेत त्यामध्ये गवंडी 300 किट, गवंडी कामगारांसाठी, 62 किट फरशी फिटिंग कामगारांसाठी, 42 किट प्लंबर कामगारांसाठी, तर 20 किट इलेक्ट्रिक कामगारांसाठी आले आहेत.
त्या कामगारांना किट वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन मिळावे कामगारांना दिले जाणाऱ्या या किटमध्ये जवळपास चार ते पाच हजार रुपये किमतीचे लागणारे साहित्य आहे. याचा सदुपयोग करून आपल्या जीवनात सुखी व समृद्धी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत . खात्याच्या वतीने टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने कामगार किट किंवा इतर सहाय्य धन मिळत असते एकाच वेळी सर्वांना मिळणे शक्य नाही. जास्तीत जास्त कामगारांच्या पर्यंत हे पोहोचवण्यासाठी सरकार दरबारी आपण प्रयत्न करू असे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी दिले.