खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधि:
गेल्या अनेक वर्षापासून अनमल प्रायव्हेट लिमिटेड च्या पोल्ट्री फार्म पासून आम्हाला जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी असलेली पोल्ट्री बंद करण्यात यावी यासाठी आंदोलने छेडली. त्यानुसार पोल्ट्री कंपनीने या ठिकाणी कॉलिटी ऍनिमल फील्ड यांचा परवाना रद्द झाल्यानंतर आता नव्याने हॅचरी प्रॉडक्ट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यालाही या गावातील ग्रामस्थांचा विरोध असून येथील नागरिकांच्या आरोग्याच कोणीही कळू नये व यासाठी ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा परवाना क्वालिटी कंपनीला देऊ नये, दिल्यास ग्राम पंचायत समोर तीव्र आंदोलनाचा इशारा केला जाईल अशा इशारा ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच व्हिडिओ यांना कौलापूरवाडा ग्रामस्थांच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की बैलूर ग्राम पंचायतीने गेल्या पंधरा वर्षापासुन क्वालिटी अनिमिल फिल्ड यांचा परवाना रद्द करून त्याना कुठलीही परवानगी दिली नाही. त्याच प्रमाणे यापुढेही क्वालिटी अनिमल प्राव्हेट लिमिटेडच्या कोंबडी फॉर्म व हॅचरी प्रोजक्टला परवानगी (एन ओ सी) देऊ नये. अशी मागणी निवेदनात केली आहे. क्वालिटी अनिमल फील्ड नवीन हॅचरी प्रोजेक्ट पौल्ट्री फार्म चे अनधिकृत बांधकाम गावापासून १०० मीटर वर असणारे त्वरित बंद करण्याचे नोटीस ग्राम पंचायत कडून बजावण्यात आले होत. त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी निवेदन देताना कौलपुरवाडा गावचे ग्रामस्थ, भैरू पाटील, बाबू बावदाने, अप्पू शिंदे, लक्ष्मण बंनार , सकुबाई पाटील व गावकरी उपस्थित होते. ग्राम पंचायत अध्यक्ष व ग्राम पंचायत अधिकारी यानी निवेदनाचा स्वीकार करून कौलापूर ग्रामस्थांवर कोणताही अन्याय होवू देणारं नाहीं असे आश्वासन दिले.