IMG-20241002-WA0061


खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : तालुक्याच्या भीमगड अभयारण्य तथा इको सेन्सिटिव्ह झोन मधील एखादे झाड तोडणे म्हणजे हा खुना पेक्षाही मोठा गुन्हा समजला जातो. पण एका खाजगी जमिनीत सिसम, सागवांची झाडे तोडून रस्ता करण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याला पाठीशी घालून वन खात्याने डोळे झाक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे या झाडे कत्तल प्रकरणात कोणकोणत्या शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. त्याची सत्यता काय? त्याचा खुलासा वनखाते करील काय? असा प्रश्न खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, शिरोली जवळील खाजगी मालकीच्या सर्वे नंबर 97 मधील जमिनीत जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी अनेक झाडांची कत्तल गेल्या चार दिवसापूर्वी करण्यात आली. पण या प्रकरणाकडे वन खात्याने डोळे झाक करून एक प्रकारे त्या जमिनीचे मालक असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे. एकीकडे जंगलपट्ट्यातील गावांना एखाद्या गावाला रस्ता करण्यासाठी विरोध केला जातो. एखादे झाड तोडले की त्यावर कायदेशीर कारवाई वनखाते करते, पण एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्याच कुटुंबातील एकाच्या नावे घेतलेल्या जमिनीतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे निदर्शनाला आल्याने आता त्या अधिकाऱ्यावर वनखाते कारवाई करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

____________________प्रतिक्रिया_________________

वनखात्याचा गजब कारभार ….?

सामान्य शेतकर्यांने स्वताच्या मालकीतील चुकून विनापरवाना झाडं तोडले तर वनअधिकारी थयथयाट करतात… कारवाई करतात लोकांना त्रास देतात. इथे तर वनखात्याच्या व मालकीच्या जमिनीतील शिसम व सागवान ची झाडे तोडली असून खानापूर वनखाते ४ दिवस झाले झोपले आहे का ? एवढा कसला दबाब आहे वनखात्यावर ? कोणता राजकीय हस्तक्षेप आहे का ? कोण सरकारी अधिकारी वनखात्यातील अधिकाऱ्यांना धमकी देतोय का ? वनखाते कारवाई करण्यास घाबरतं आहे का ? शिसम व सागवान ची झाडे तोडून केला रस्ता ? सत्यता नक्की काय आहे ? खुलासा कधी होणार ? हाच न्याय सामान्य खानापूरकरांना लागू करणार का ? यासंदर्भात लवकरच वनमंत्र्यांकडे वनअधिकार्यांच्यावर कारवाईची मागणी करणार
: ॲड ईश्वर घाडी ( ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष )

_______________________________________

गोर गरीब शेतकरी, सामान्य लोकांना वेगळा न्याय व मोठ्या लोकांना वेगळा न्याय हा गजब प्रकार खानापूर तालुक्यात चालू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ? मग ते वनखाते असो किंवा गणेबैल टोल असो. सामान्याना टोल व धन दांडग्यांना टोलमाफी. खानापूरचे वनखाते सामान्य लोकांना पण आता विना परवानगी सागवान,शिसम ही जंगली झाडे तोडायची परवानगी देणार का ? असा प्रश्न तालुक्यातील सामान्य जनतेस पडला आहे.

महादेव कोळी , केपीसीसी सदस्य

_________________________________________

लोंढा वनविभागात गुन्हा दाखल : हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई शक्य

  वनविभागाची परवानगी न घेता 11 प्रजातीची व इतर झाडे तोडल्याप्रकरणी कमला पांडुरंग कांबळे नामक महिला शेतकऱ्यावर लोंढा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. वनविभागाकडून विद्युत तार बसवणाऱ्या हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे .मालकीच्या जमिनीवरील झाडे तोडण्यासाठीही वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. परवानगीशिवाय झाडे तोडणे बेकायदेशीर आहे. याशिवाय वनविभागामार्फत रस्ता बनविण्याचे बंधन आहे. त्याचबरोबर रस्ता बेकायदेशीरपणे खोदल्याचा आरोपही आहे. कांबळे याच्यावर कर्नाटक वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सुनिता निम्बर्गी , A C F खानापूर तालुका

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us