खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “स्वच्छता हीच सर्वोत्कृष्ट सेवा आहे !” या ओळीचा विद्यार्थिनींनी आदर राखावा व स्वयंशिस्तीसह आपला परिसर ही स्वच्छ ठेवावा व ठेवण्यास इतरांना उपकृत करावे या हेतूने दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून माझा परिसर माझी जबाबदारी स्वच्छता अभियानाची जनजागृती मोहीम कार्यान्वित करण्यात आली.
सुरूवातीला प्राचार्य श्री अरविंद पाटील यांनी सभोवतालच्या घाणीमुळे आनदी जीवनावर होणारे घातक परिणाम, उंदीर, डास, झुरळ यासह डेंग्यू मलेरिया सारख्या वारंवार उत्पन्न होणाऱ्या रोगाची माहिती व स्वच्छतेची गरज यावर आपले मनोगत व्यक्त करताना भावस्पर्शी उदाहरणं दिली. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सर्वत्र स्वच्छता राखावी यासाठी आवाहन केले.
त्यानंतर काॅलेज विद्यार्थिनींनी व शिक्षक वर्गाने डोकीवर गांधी टोपी परिधान करून समस्त खानापूरवाशीयांना कचारा उघड्यावर किंवा रस्त्यावर फेकू नका, डस्टबिनचा वापर करा, प्लॅस्टिकचा वापर टाळावा, थर्माकोलचा मोह सोडावा, सांडपाण्याचा योग्यप्रकारे विल्हेवाट लावावा यावर आधारित घोषणा माहिती पत्रकं,” वैष्णवजन तु तेने करीये पीडपयवरायी जाने रे” हे गीत गात हातात आकर्षक रंगीबेरंगी फलक घेऊन सारा परिसर दणाणून सोडला. सदर स्वच्छतेची प्रभातफेरी
ताराराणी कॉलेज पासून राजा शिव छत्रपती शिवस्मारक, स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, रविवार पेठ, चौराशी मंदिर पासून जांबोटी रोड, नवीन बस डेपो ते कॉलेज अशा परिसरात काढण्यात आली. या प्रचार फेरीचे नेतृत्व राज्यशास्त्र प्राध्यापिका जे एफ शिवठणकर यांनी केले व हा लोकाभिमुख उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी बरेच परिश्रम घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. या प्रचार फेरीत महाविद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थीनीनी स्वयंसेवी सहभाग दर्शविला.
यानंतर सदर विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्गाने आपल्या महाविद्यालय आवारात स्वच्छता मोहीम राबवून हा दिनाचे महत्त्व समजावून घेतले. तद्नंतर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील हे होते व्यासपीठावर ज्येष्ठ प्रा. एन ए पाटील प्रा.मंगल देसाई प्रा. मनिषा एलजी, प्रा.जयश्री शिवठणकर, प्रा. सोनाल पाटील प्रा. दिपाली निडगलकर, प्रा. एय सी सावंत, प्रा. एन एम सनदी, प्रा टी आर जाधव व शालेय स्वच्छता कर्मचारी श्री जोतिबा घाडी, श्रीमती रेणूका मावशी, श्रीमती पूजा गुरव व सर्वविद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा लाड द्वितीय वाणिज विभाग या विद्यार्थिनीने महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. गांधीजींचा जीवन प्रवास यावरती आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर कुमारी संगीता होसुरकर द्वितीय वाणिज्य विभाग या विद्यार्थिनीने लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला .लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन प्रवास यावरती आपले विचार व्यक्त केले. प्राध्यापक वर्गातून प्राध्यापक टी आर जाधव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी बहुमोल असे विचार मांडले.
शेवटी प्राध्यापक आय सी सावंत यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्राध्यापक एन एम सनदी यांनी केले.