खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
आज बुधवारी सर्वपित्री अमावस्या. या अमावस्येच्या निमित्ताने खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावर भाविकांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. उद्या गुरुवारपासून सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या नवरात्र उत्सवात घटस्थापनेपासून विजयादशमी / दसऱ्यापर्यंत उपवास, दैवतांचे कुलदैवतांचे पूजन केले जाते. यासाठी पितृपक्ष कालावधीनंतर अमावस्येपर्यंतचा काळ यल्लमा देवीच्या अनेक भक्त देवीला देवीच्या नावे जोगवा मागून साजरा करतात. अमावस्येला याची सांगता करून घटस्थापनेला देवीचा जागर सुरू होतो. या नवरात्र उत्सव च्या पूर्वसंध्येला गुरुवारी अमावस्या निमित्त नदीघाटावर खानापूर, बेळगाव भागातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या ठिकाणी गंगापूजन, रेणुका देवीच्या पडली पूजन, व प्रसाद आधी कार्यक्रम करून नवदुर्गेच्या उत्सवाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज नदी घाटावर हजारोंच्या संख्येने महिला, बालक तसेच पुरुष मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यामुळे मलप्रभा नदी गटावर गुरुवारी दिवसभर जणू यात्रेचेच स्वरूप निर्माण झाले होते.