खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
शरीराचा सर्वात महत्वाचा भाग हा आपल्या शरीराचे हृदय होय. आपल्या दैनंदिन आहारातील प्रमाण , शरीरातील कोलेस्ट्रॉल ची क्षमता दैनंदिन व्यायाम या सर्व बाबी हाताळात हृदयाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हृदय विकार होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय यासंदर्भात वेळीच काळजी घ्यावी तरच मनुष्याला सदृढ आरोग्य प्राप्त होईल असे विचार मुंबई येथील माधवबाग मेडिकल केअर चे हृदयरोग तज्ञ डॉ. निलेश कुथले यांनी व्यक्त केले. खानापूर येथे इन्नरव्हील क्लब तसेच लायन्स क्लब खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक खानापूर येथे हृदय रोग उपचार व काळजी यासंदर्भात आरोग्य शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्नरव्हील क्लब च्या अध्यक्षा शरयू कदम होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लब खानापूर चे अध्यक्ष सागर उप्पीन होते. मुंबई येथील प्रसिद्ध माधवबाग मेडिकल केअर चे हृदयरोग तज्ञ् डॉ. निलेश कुलते बेळगांव येथील आयुर्वेद तज्ञ् डॉ. संगीता खाजे यांच्या हस्ते दिप्रज्वलन करण्यात आले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात शिल्पा अद्यताय यांच्या प्रार्थना गीताने झाली.
- डॉ निलेश सुभाष कुलते, यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, हृदय विकार होण्याची कारणे कोलेस्टोरॉल, डायबेटीज, शुगर, BP यांचे जर प्रमाण आपल्या शरीरात वाढूले तर हृदय विकार होण्याची संभावना वाढते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा पोहचण्यास समस्या उद्भवते. त्यासाठी आपल्या खान्यातून योग्य ते प्रमाण शरीरात जाईल अशाप्रकारचे अन्न सेवन केले पाहिजे, जसे की फळे, कच्चा पाले भाज्या यांचे योग्य प्रमाणात सेवन कराव्यात. त्याचबरोबर पंचकर्म करणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर स्ट्रेस,टेस्ट वर्षातून एकदा तरी करावीच. त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाची अवस्था कशी आहे हे आपल्याला समजते आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजेत.
डॉ संगीता वाझे यांनी आयुर्वेद आणि हृदय रोग उपचार या संबंधित बरीच माहिती त्यांनी सांगितली. यावेळी इनरव्हिल क्लब तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इन्नरव्हील क्लब च्या दीप्ती बडदाली यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.