खानापूर/ प्रतिनिधी:
संगोळी रायण्णा यांची कर्मभूमी तथा समाधी स्थळ असलेल्या नंदगड गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी यात्रा तब्बल 25 वर्षानंतर येत्या 2025 फेब्रुवारी च्या 12 तारखेपासून तब्बल 11 दिवस भरणार आहे. या यात्रा उत्सवापूर्वी नंदगड गावातील वीज पाणी व रस्ते समस्या, तसेच इतर मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासंदर्भात खानापूर तालुका शासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक उत्तर कन्नड खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. नंदगड येथील कृषिपतीन सोसायटीच्या सभागृहात आयोजित या समस्या निवारण बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते.
बैठकीत प्रारंभिक माजी आमदार अरविंद पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून गावातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पासून तालुका पातळी अधिकाऱ्यांनी आत्तापासूनच कामाला लागले पाहिजे. प्रामुख्याने नंदगड गाव तब्बल 15 ते 18 हजार लोक वस्तीचे आहे. इथे दर बुधवारी बाजार भरतो. शिवाय संगोळी रायना समाधी स्थळाला भेट देणारे अनेक पर्यटक देखील या ठिकाणी ये जा करत असतात. त्यामुळे नगरच्या तीनही प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती बरोबर गावातील वीज, पाणी समस्या मधील तांत्रिक अडचणी दूर करून सुविधा पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी खासदार तसेच अधिकाऱ्यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना खासदार हेगडे यांनी नंदगड हे संगोळी रायण्णा समाधी स्थळ आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे जरी सुरू असले तरी श्री महालक्ष्मी यात्रेच्या काळात लाखो व्हावी या ठिकाणी इजा करणार आहेत त्यामुळे या गावाला जोडणारे रस्ते वीज समस्या पाणी समस्या संदर्भात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यानी आराखडा तयार करून या ठिकाणी आवश्यक योजनांची माहिती घेऊन लवकरात लवकर ती पूर्तता करावीत असे सांगून प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्या संदर्भात विचारणा केली.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना नंदगड गावच्या समस्या संदर्भात येथील पंच कमिटीने आपले निवेदन दिले आहे यानुसार संबंधित खात्यांना आपण सूचना केल्या आहेत. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरात आपला अहवाल व आवश्यक कामाची यादी पूर्तता करावी. अधिक अडचणी व विकासासंदर्भात पालकमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच 75 कोटी अनुदानातून संगोळी रायण्णा म्युझियम काम सुरू आहे ते अंतिम टप्प्यात असून येत्या जानेवारीपर्यंत ते लोकार्पण करण्यासाठी सरकार पावला उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विलासराज , तसेच पाणीपुरवठा, हेस्कॉम, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जिल्हा पंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव तसेच पंच कमिटीच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव उपाध्यक्ष दोडमणी तसेच सर्व सदस्य, श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य पि.के पाटील ,गुंडू हलशीकर, प्रसाद पाटील, नरसिंह पाटील, राजीव कपूर, राजू पाटील यासह अनेकजण उपस्थित होते.