खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर येथे ईलीट स्पोर्ट क्लब च्या वतीने रविवारी सकाळी झालेल्या दहा किलोमीटर धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत तोपीनकट्टी येथील कल्लाप्पा तीरवीर यांनी दहा किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे मेडल पटकावले आहे.
या स्पर्धेत विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये 55 ते 64 वयोगटांमध्ये कल्लाप्पा तिरविर यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना संयोजकांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कल्लाप्पा तीरवीर हे एक उत्तम धावपटू म्हणून नामांकित आहेत. कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणी अनेक धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अनेक वेळा यश संपादन केला आहे. वयाच्या 53 व्या वर्षापर्यंत त्यांनी सातत्याने अनेक परिश्रम घेऊन आशिया खंड आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील त्यांनी भाग घेतला. रोजंदारीच्या निमित्ताने कोल्हापुरात स्थायिक होऊन त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करत आज ते एक उत्तम धावपटू म्हणून आपले नाव कमावत आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.