खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी चार कोटी तेरा लाखाचा निधी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मंजूर केला आहे. सदर कामांचा शुभारंभ शुक्रवार दि. 27 रोजी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विकास कामातून कणकुंबी ते चिकोळे या दोन किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याचा भूमिपूजन आज सकाळी होणार आहे. त्यानंतर जवळपास 13 गावामध्ये घटक पाणी योजनेसाठी 2 कोटी 13 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून याही कामांचा शुभारंभ आज शुक्रवारी दिवसभर आयोजित करण्यात आला असून. प्रारंभी गोल्याळी येथे पाणी घटक योजनेसाठी मंजूर झालेल्या 10 लाख 19 हजाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर आमटे, चिगुळे, कणकुंबी, पारवाड, चिखले, नागुर्डा, मोहिशेत, लोंढा, कापोली के.जी, हलगा, घोटगाळी बिजगरणी या एकूण 13 गावात सायंकाळी सहा पर्यंत भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या भागातील नागरिकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहेत .