खानापूर प्रतिनिधी:
लोककल्प फाउंडेशन तसेच केएलई आयुर्वेदिक अँड रिसर्च सेंटरच्या वतीने जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून चापगाव येथे मोफत हृदयरोग ईसीजी चिकित्सा शिबिर गुरुवारी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दीप प्रज्वलन के एल ई आयुर्वेदिक अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे डॉ. गुरुराज, लोककल्प फाउंडेशनचे संयोजक सुरज सिंह रजपूत, भाजपा तालुका प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ, ग्रा.पं. माजी अध्यक्ष रमेश धबाले, तालुका राशन दुकान संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी, ग्रामपंचायतीचे सदस्य नजीर सनदी, शिवाजी मादार , महादेव दळवी, बाबू घार्शी, अभिजीत पाटील, अर्जुन मादार यासह गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत मराठी शाळा कमिटीचे अध्यक्ष मष्णू चोपडे यांनी केले. यावेळी बोलताना पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी लोककल्प फाउंडेशन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राच्या विकासासाठी तालुक्यात 32 गावे दत्तक ग्राम म्हणून हाती घेतले असून त्या गावात विविध कार्यक्रम राबवणे जात आहेत. यामध्ये चापगाव गावचा देखील समावेश करण्यात आला असून गेल्या पाच सहा महिन्यापासून लोककल्प फाउंडेशनच्या सहयोगातून विविध कार्यक्रम आरोग्य शिबिर, शाळांचा विकास, आधी कामे राबवली जात आहेत. त्यामुळे लोककल्प फाउंडेशनचे त्यांनी धन्यवाद मांडले. यावेळी हृदय रोगाशी संबंधित ईसीजी तपासणी, रक्तदाब, तसेच इतर आरोग्यविषयक बाबीवर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 200 हून अधिक रुग्णांनी सहभाग घेतला होता.