खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गोव्याच्या दोन्ही सरहद्दीवर दोन प्रमुख मार्गाची जोडलेला खानापूर तालुका आहे. पण तालुक्याच्या बहुतांश भागातून चोरट्या मार्गाने गोव्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. खानापूरच्या दिशेने गोव्याला मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासह विविध प्रकारची जीवनोपयोगी वस्तू पुरवठा होतात. त्यामध्ये प्रामुख्याने चोरट्या मार्गाने बीफ तथा जनावरांचे मांस मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे अनेकांच्या निदर्शनाला आले आहे. यामुळे या वाहतुकीस प्रशासनाची परवानगी आहे की? चोरट्या मार्गाने ही वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होताना दिसतो.
एरवी जनावरांची चोरटी वाहतूक होताना किंवा जनावरांचे मांस वाहतूक करताना अनेक अनेक संघटनांचे लोक विरोध दर्शवताना दिसतात. पण चोरट्या मार्गाने बिफ वाहतुकीस कोणाचा आशीर्वाद तर नाही ना ? असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. गोव्याला चोर्ला मार्गे त्याचबरोबर हेमडगा मार्गे दोन प्रमुख रस्ते जोडतात या दोन्ही रस्त्यावरून रात्रीस खेळ चाले.. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हेमडगा मार्गावर असणाऱ्या वन खात्याच्या चेक पोस्टवरही अशा वाहनांना कधी अडवले जात नाही. त्यामुळे या ठिकाणीही रात्रीस खेळ चाले अशी परिस्थिती होत असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी हेमडगा मार्गावर पोलीस प्रशासनासह वन खात्याने याची गांभीर्याने दक्षता घ्यावी शिवाय चोर्ला मार्गाने देखील अशा वाहतुकीला पायबंद करण्यासाठी चेक पोस्ट नाक्यावर क** तपासणी करून अशा अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे
.