खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
अलीकडच्या काळात आपण ज्या शाळेत शिकलो, वाढलो, मोठे झालो अशा शाळांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन काही ठिकाणी बदललेला दिसून येतो. पण अनेक असे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी शाळेला आधुनिकतेची जोड देण्याच्या दृष्टिकोनातून होणारे प्रयत्न हे उल्लेखनीय ठरतात. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असा संकल्प घेऊन आपल्या खेडेगावातील शाळेला उच्च दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या बऱ्याच ठिकाणी दिसून येते . अशाच पद्धतीने आपल्या शाळेला उर्जित अवस्था देण्याच्या दृष्टिकोनातून माजी विद्यार्थी ग्रामस्थ पालक व शिक्षकांनी घेतलेला संकल्प हा उल्लेखनीय ठरतो. अशाच प्रकारे भिमगड अभयारण्यातील दुर्गम खेड्यात येणारे जामगाव येथील आदर्श विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी नवा संकल्प घेऊन येथील मराठी सरकारी प्राथमिक शाळेला आधुनिकीकरण करण्याचा उद्देश हाती घेतला आहे. शाळेला आधुनिकीकरणाची जोड देऊन पॅनल , स्मार्ट इंटर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेला देण्ग्या दिल्या. या देणगीतून साकारण्यात आलेल्या डिजिटल बोर्ड चा उद्घाटन कार्यक्रम शनिवारी माजी विद्यार्थी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अप्पू केळु गावकर होते.
यावेळी व्यासपीठावर महादेव गावकर , नारायण गावकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी शिरोली केंद्राचे केंद्रप्रमुख B.A.देसाई , ग्रामपंचायत सदस्य दीपक गवाळकर , कृष्णा गुरव उपस्थित होते. मारुती गावकर, बळीराम कनकुंबकर, प्रकाश गांवकर, शंकर गावकर, ज्ञानेश्वर गांवकर, बाबुराव आरसकर ,संभाजी नागम, मारुती सुखये, विनोद सुखये, फट्टू कणकुणकर, संदीप गावकर , लक्ष्मन अय्यर सह पालक शिक्षक उपस्थित होते . शाळेच्या या नूतनीकरणासाठी बाल हनुमान क्रिकेट क्लब जामगाव यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात रोख पन्नास हजार रुपये तर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्गाने मिळून 30 हजार रुपये अशी देणगी दिली आहे. तर माजी माजी विद्यार्थी तथा शिक्षक आणि एक व्हाट्सअप ग्रुप करून त्या द्वारे जवळपास 40 हजार रुपयाचा निधी जमा केला आहे. या सर्व निधीतून शाळेच्या आधुनिकीकरणाचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे.
खानापूर तालुक्यातून लोक वर्गणी जमा करून शाळेसाठी डिजिटल पॅनल बसवलेली जामगाव ही दुसरी शाळा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गाव लोकसंख्येच्या बाबतीत छोटे आहे पण शाळेच्या देणगीसाठी सतत मोठे आहे. जामगाव गावातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान स्नेही ज्ञान मिळावा यासाठी हा प्रयत्न करण्यात आला . शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने प्रयत्न करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सविता कांबळे यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मधभावे यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत कुमारी निकिता गावकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार कुमारी प्रतीक्षा तिनेकर नी केले.