खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
कोणत्याही व्यवसायात प्रामाणिक सेवा हीच त्या सेवेतील खरी संपत्ती आहे. रिक्षा चालक व्यवसाय हा समाजाचा एक प्रामाणिक कणा समजला जातो. गोरगरीब श्रीमंतांना घरपोच करण्याची जबाबदारी ही रिक्षा चालक नेहमी उचलतात. अनेक वेळा रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर येतो. तसाच प्रामाणिकपणा खानापुरातील रिक्षा चालकानी देखील कायम राखावा. तुमच्यातील प्रामाणिकपणा हीच तुमची खरीच संपत्ती असेल असे सांगून खानापूर शहरात शिवस्मारक चौक याचबरोबर हायटेक बस स्टॅन्ड परिसरात नव्याने होणारे रिक्षा स्टॅन्ड ते खानापूरच्या वैभववात भर घालणारे आहेत. आज डॉ. बी आर आंबेडकर रिक्षा स्टँड उभारून या परिसराला शोभा वाढवली आहे. याच पद्धतीने सर्व रिक्षा चालक आणि ग्राहकांना प्रामाणिक ग्राहक सेवा बजावावी, याची दक्षता घेत चालक म्हणून राखणारा प्रामाणिकपणा नेहमी लौकिक राहील असे उद्गार माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. शनिवारी खानापूर येथील हायटेक बस स्थानकाच्या बाजूला नव्याने डॉक्टर बी आर आंबेडकर रिक्षा असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र यल्लाप्पा पाटील होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार अरविंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा माजी अध्यक्ष संजय कुबल, तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, खानापूर मंडल निरीक्षक मंजुनाथ नाईक आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुका प्रधान कार्यादर्शी गुंडू तोपिनकट्टी मल्लाप्पा मारीहाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे खानापूर बस आगार प्रमुख कांबळे, भाजपा युवा नेते पंडित ओगले, राजू पासलकर, अभिलाष बालेकुंद्री, रवी काडगी, बाबा देसाई, अलीम अख्तर नाईक, डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डी इ. नाडगौडा, खानापूर लायन्स क्लबचे संचालक अजित पाटील , डॉ. बेतगावडा, नितीन पाटील, प्रविण पाटील, निवृत्त प्राचार्य हमणनावर, आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिसनिरिक्षक मंजुनाथ नाईक यानी सामाजिक बांधिलकी व प्रामाणिकपणा हा रिक्षा चालकांचा पैलू आहे. तो जपण्याचे कार्य रिक्षा चालकाने करावे असे त्यांनी सूचित केले. यावेळी बोलताना भाजपा माजी अध्यक्ष संजय कुबल, काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, प्राचार्य हमनावर, भाजपा प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ आदींची भाषणे झाली.