खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
मराठा मंडळ शिक्षण संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था परिचयाची आहे. या संस्थेतील शाळा महाविद्यालयांना अध्यक्षा मान. डॉक्टर राजश्री नागराजू यांचे सतत मार्गदर्शन लाभत असते या शिक्षण संस्थेत, निरंतर लोकोपयोगी गोष्टी बरोबर विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जातात. त्यापैकी खेळ हा संस्थेच्या जीवाभावाचा घटक आहे, विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा खेळाला या संस्थेने खूप प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट आहे.
याचेच फलित म्हणजे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थीनींनी जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धैत रामदुर्ग तालुक्यातील सुरेबाण या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करून जिल्ह्यातील गाजलेले बलाढ्य संघाचा सहज पराभव केला.
पहिला सामना सौंदत्ती तालुका संघाला नमवून दुसरा सामना कित्तूर तालुका संघाला नमवून दणदणीत विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश. मिळविला. अंतिम सामना बेळगाव तालुका संघ या बलाढ्य संघाबरोबर झुंज लागली. कबड्डी अंतिम सामन्यात बेळगाव तालुका संघाबरोबर निसटता पराभवामुळे दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले. या संघात कुमारी सोनाली धबाले, आरती तोरगल, संगीता होसुरकर, लक्ष्मी गोरल, साधना होसुरकर, प्राजक्ता निडगलकर, मलाश्री पाटील, सानिका वीर, वैष्णवी कदम, नेहा पाटील, पूजा पाटील, प्रतीक्षा पाटील, मीनाक्षी पाटील या खेळाडूंनी आपली चमक दाखविली व मराठा मंडळ संस्थेत मानाचा तुरा रोवला आहे.
कुमारी सोनाली धबाले, आरती तोरगल, साधना होसुरकर, संगीता होसुरकर, या चार विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मिळवलेले यश व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागराजू यांनी विशेष कौतुक केले. मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीमान परशराम गुरव व शिवाजीराव पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे तसेच कॉलेजचे प्राचार्य श्रीमान अरविंद पाटील , प्रशिक्षक भरमाणी पाटील, क्रीडा कमिटी चेअरमन प्राध्यापिका श्रीमती एम वाय देसाई व प्राध्यापक वर्ग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.