खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरमानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने 61 किलो वजन गटात तालुक्यात आपले प्रावीण सिद्ध केले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने उपांत्य फेरीत 10-0 व अंतिम फेरीत 10- 2 अशा गुणाने प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी ठरली व राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. कुमारी श्रावणी कुसमळी येथील युवा कार्यकर्ते भरमानी पाटील यांची कन्या असून तिने थाळीफेक व गोळा फेक क्रीडा प्रकारात सुद्धा स्वतःचे प्राविण्य सिद्ध केले आहे. ती विश्वभारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असून तिला कुस्ती प्रशिक्षक श्री सुनील ठाणब यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक महेश सडेकर व इतर शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले आहे .
जाबोटी कणकुंबी परिसरातून कुस्ती क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारनारी कुमारी श्रावणी पहिली विद्यार्थिनी आहे त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.