खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था म्हणून बेळगावच्या शैक्षणिक वलयात सुपरिचित आहे.
“चिन हा देश जगातील उत्तम खेळाडू तयार करणारा देश आहे कारण तिथे मुलांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी खेळाच्या कल चाचण्या केल्या जातात म्हणजेच खेळाचे बाळकडू तेथील विद्यार्थ्यांना अगदी लहान वयात पाजले जाते म्हणून तो देश जागतिक कीर्तिची कामगिरी करू शकतो, आज आपल्या देशालाही अशा क्रीडा संस्कृतीची गरज आहे आपण ती आपल्या पासून सुरूवात केली पाहिजे”, असा मनोदय असणाऱ्या मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहे. याचचं फलीत म्हणजे कालपरवा तालुकास्तरीय स्पर्धेत चुणूक दाखवलेल्या मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील टेनीस हाॅलीबल स्पर्धेतील खेळाडू विद्यार्थींनीनी
यरगट्टी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. व मराठा मंडळ संस्थेच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. कुमारी सोनिया घाडी, कुमारी दीक्षा शिरोडकर, कुमारी मनीषा बरूकर यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यांच्या या उज्ज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धेत या स्पर्धकांचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी विशेष कौतुक केले असून ज्येष्ठ संचालक श्रीमान परशराम गुरव, श्री शिवाजीराव पाटील यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले आहे. तसेच कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन त्यांना लाभत असून क्रीडाप्रेमी मार्गदर्शक श्री भिमशी व कमिटी चेअरमन प्रा. श्रीमती एम वाय देसाई हे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत यशोमय झेंडा फडकविण्यासाठी त्यांचा कसून सराव घेत आहेत.