खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
बालपणापासूनचे मित्र अन सवंगड्यांचा मेळा हा कधीही विसरू शकत नाही. शालेय जीवन हे आनंदाचे, खोड्या काढत, दंगा मस्ती करत आनंदी जीवन जगण्याचा काळ असतो. प्राथमिक शिक्षण घातल्यानंतर माध्यमिक शिक्षणात जाणारे प्रौढ वयातील जीवन हे अनेक आठवणी तथा जीवनाला वळण देणारे ठरते.पण त्या आठवणी आयुष्यात कायम जागा करून जातात अशा या आठवणींचा उजाळा देण्यासाठी 2006-07 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा म्हणजे ऋणानुबंध जपणारा ठरणारा असल्याचे उद्गार सह शिक्षक पि. के गोरे यांनी व्यक्त केले. तोपिनकट्टी येथील महालक्ष्मी हायस्कूल मध्ये 2006-07 सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम एस आरगु होते.
यावेळी व्यासपीठावर सहशिक्षक एल. डी. पाटील. जी एम खांबले , एन. एम. पाटील, हिरेमठ, आर् एन. होसुरकर, जाधव, एस पी कुट्रे ,घाटके मॅडम, रमेश सुतार आधी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात वर्ग मित्रांनी एकमेकांना आलिंगन देत आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन सन्मानित करण्यात आले. 2006-07 सालातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर आज उद्योग व्यवसाय नोकऱ्या करत आहेत. अशा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साधलेला संवाद व जपलेले आपुलकीचे नाते एकमेकांना उजाळा देणारे ठरले. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुलींनी इशस्तवन व स्वागत गीताने केले त्यानंतर सरस्वती पूजन दीप प्रज्वलन उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.