IMG_20240915_134841

खानापूर : जीवनात शिक्षक विज्ञान देताना प्रत्येक शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांचे पुस्तक, पाठ वाचता आले नाही तरी चालेल पण त्या विद्यार्थ्यांचा चेहरा वाचता आला पाहिजे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती व शिक्षणाबद्दल असलेली आपुलकी याची जाण त्या शिक्षकाला असणे गरजेचे आहे. तरच तो शिक्षक आदर्श शिक्षक बनू शकतो. तसेच त्या शिक्षकाने सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या नजरेत आदर्शचा राखावी. विद्यार्थ्याबद्दलच्या विषयाची काळजी करणारे शिक्षक नक्कीच स्वतःच्या जीवनात, समाजात मानाचे स्थान मिळू शकतो. अशा सर्व संपन्न शिक्षकांनाच आदर्श शिक्षकाचा सन्मान मिळतो हे विसरून जाणार नाही. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनेक शिक्षकांना दिलेला हा पुरस्कार गौरविणारा असून अशा शिक्षकांचा सन्मान हे कर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्र एकिकरण समितीने गौरविलेला हा सत्कार लागेल असे विचार माजी महापौर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यवाह मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले.

रविवारी खानापूर महाराष्ट्रातील सर्व समितीच्या वतीने शिवस्मारक आदर्श शिक्षक व आदर्श शाळांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते .व्यासपीठावर प्रकाश मरगाळे, सीमा तपस्वी शंकर पाटील , मारुती परमेकर, पांडूरंग सावंत, यांनी विचार मांडले.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी करून तालुक्यातील आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा हेतू व समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी तालुक्यातील मराठी भागात येणाऱ्या मराठी शाळेतील ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक तथा जिल्हा आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार मिळालेल्या आहे अशांच्या गौरव करण्यात आला.

खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते (प्राथमिक विभाग – मराठी) श्री टी. आर. गुरव- सरकारी मराठी शाळा नंदगड, श्रीमती एम. आर. पाटील सरकारी मराठी शाळा मोदेकोप, श्री व्ही. एम. सावंत सरकारी मॉडेल मराठी शाळा खानापूर, डी एस देसाई, गुंडपी शाळा. संध्या बेंचेकर ,कन्या विद्यालय नंदगड, भुजंग रामू गावडे, गवळीवाडा, एस एस मुतगी मराठा मंडळ खानापूर यांचा तसेच तालुका आदर्श शाळा पुरस्कारामध्ये सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा अबनाली, सरकारी प्राथमिक शाळा चिखले, सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा कुपटगिरी यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील बहुभाषिक मराठी असलेल्या ठिकाणी आजही शाळा व्यवस्थित रित्या टिकून या ठिकाणी समाज घडवण्याचे काम करत आहेत त्यामुळे या भागातील अनेक शिक्षक आज आदर्श शिक्षक व आदर्श शाळा घडवण्यास पात्र ठरत आहेत. याचा सार्थ अभिमान वाटतो. ते म्हणाले, मातृभाषेतील शिक्षण हे जीवन घडविण्याचे काम करते यासाठी आपल्या मातृभाषेतील शिक्षणाकडे प्राधान्य असे विनंती ही त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. आज लोकशाही दिन पण आज सीमा भागातील लोकांना लोकशाही पासून न्याय मिळतो का ? याचेही विचार आपण केला. आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नजरेत ही आदर्श राहिले पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर आपल्या विद्यार्थ्याकडून तोच आदर्श कायम ठेवण्याच्या दृष्टीने कार्य करत रहावे असेही त्यांनी सांगितले. शेवटी आभार नंदगड विभागाचे समिती कार्याध्यक्ष रमेश धबाले यांनी मांडले. कार्यक्रमाला अनेक समितीचे कार्यकर्ते, आदर्श शिक्षकांचे कुटुंबीय शाळा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us