!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या दुर्गम अशा मोचनगड च्या कुशीतील लहान खेडे अनगडी येथे जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीतून हाडाचे शिक्षक तसेच एक साहित्यिक व वक्तृत्व लाभलेले, उत्तम समालोचक श्री संजीव वाटुपकर हे आपल्या 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून येत्या 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मराठा मंडळ संचलित विविध शाळांमध्ये त्यांनी आपली 32 वर्षे प्रामाणिक सेवा बजावली आहे.. खानापूर तालुक्यात कापोली मराठा मंडळ तसेच ताराराणी मराठा मंडळ हायस्कूल मध्ये त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली आहे. ते येत्या 30 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सदिच्छा सोहळा कापोली हायस्कूल तसेच ताराराणी मराठा मंडळ हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या वतीने उद्या शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शाळेच्या सभागृहात त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संजय वाटुपकर यांचा मंडळाच्या वतीने सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर सरिता मोटराचे हलकर्णी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळाचे संचालक शिवाजीराव पाटील परशुराम अण्णा गुरव उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल जाधव राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम वृद्धीकरण करावा असे मराठा मंडळ कार्यालयचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवार दि. 15 रोजी कापोली येथे सत्कार!
मराठा मंडळ संचालित कापोली हायस्कूलच्या वतीनेही त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ येत्या रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजीराव देसाई राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून गडहिंगलज येथील घाळी कॉलेजचे प्राध्यापक शिवाजीराव भुकेले हे उपस्थित राहणार आहेत. तरी या भागातील आजीमाजी विद्यार्थी तसंच पालक वर्ग आणि उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने केले आहे.