खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
कर्नाटकात यशस्वीरित्या राबवण्यात येत असलेल्या पंच हमी योजने अंतर्गत राज्यातील गोरगरिबांना त्याचा चांगलाच लाभ होत आहे. सदर योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी व तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक तालुका पातळीवर सरकार नियुक्त हमी योजना समितीची नियुक्ती केली आहे. यानुसार खानापूर तालुक्यातही सदर हमी योजनेच्या कार्यालयाचे उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. खानापूर येथील तालुका पंचायतीच्या आवारात सदर नूतन हमी योजना निवारण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका हमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते.
यावेळी बोलताना की आयसीसी च्या सचिव माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर म्हणाल्या, कर्नाटकात हमी योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना चांगलाच लाभ मिळत आहे शक्ती योजना, गृहलक्ष्मी योजना, सह इतर योजना संदर्भात जनतेच्या समस्या असल्यास त्यांनी तालुका पंचायत कार्यालयात येऊन आपल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे. सदर योजना तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सतत समितीने कार्य करावे असे त्यांनी सुचित केले. यावेळी तालुका हमी योजनेचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.