खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील करंबळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने येत्या शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता खुल्या भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 2,222 , रू 1,777, रू 1,555 रू1,333 अशी 10 बक्षीस ठेवण्यात आले आहेत. ह्या भाषण स्पर्धेत शिवचरित्र, सोशल मीडिया संकट की संधी, प्रसार माध्यमे की प्रचारमाध्यमे असे विविध 16 विषय या भाषणासाठी देण्यात आले आहेत. तरी त्याचा स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 8722603147, किंवा 7022387163 शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.