खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील डिगेगाळी येथे तब्बल 20 वर्षाची सेवा बजावून येथील अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याची गुरुविद्या देऊन आज वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गुरूंचा आदर राखत डिगेगाळी येथील मराठी प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेला सन्मान हा चिरंतनीय आहे. अशा गुरुजनांचा आदर राखून येथील माजी विद्यार्थिनी केलेला हा सन्मान एक गुरुला दिलेली एक प्रकारे गुरुदक्षिणाच ठरू शकते असे विचार पुणे स्थित उद्योजक व माजी विद्यार्थी सिद्धाप्पा भोसले यांनी व्यक्त केले. नुकताच डिगेगाळी येथील प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका राशन दुकान संघटनेचे उपाध्यक्ष के.आर. देसाई होते.
यावेळी डिगेगाळी प्राथमिक शाळेत तब्बल वीस वर्षे सेवा बजावून येथील विद्यार्थी घडवण्याचे कार्य केलेले मराठी विषयाचे निवृत्त मुख्याध्यापक पुंडलिक आप्पांना पाटील (माणिकवाडी) वय 85 यांचा तसेच येथील कन्नड शिक्षक मरीकट्टी यांनी 17 वर्षे सेवा बजावून या शाळेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शिक्षकी सेवेतील प्रामाणिकपणाच्या कार्याची दखल घेऊन येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुजनांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला. त्या गुरूंच्या विद्यार्थ्याने येथील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. याची आठवण ठेवून त्या माजी विद्यार्थ्यांनी सदर गुरुजनांना श्रीफळ शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी गुरुजनांच्या सेवेतील कार्याचा आढावा रमेश मादार, पुंडलिक नाळकर, रमेश भोसले आदींची भाषणे झाली
यावेळी माजी विद्यार्थी ,हनमंत नाळकर, रमेश भोसले, पुंडलिक पाटील, पुंडलिक पेडणेकर, लक्ष्मण नाळकर, शंकर पाटील , शिवाजी देसाई, गिरीश देसाई, शाम देसाई, राजाराम नाळकर, संजय देसाई, टोपाना मादार ,शशिकांत नाळकर, कृष्णाजी पाटील, प्रताप देसाई, सोनापा नाळकर, नामदेव रा नाळकर ,जैनु नाळकर , अंगणवाडी सेविका शारदा पाटील, नागुली नाळकर ,(माजी सदस्य आस्विनी कृ देसाई ),विठ्ठल मा नाळकर ,निळकंठ नाळकर, बाळु नाळकर आन्नाजी जाधव ,गोपाळ नाळकर, परशराम व नाळकर,कृष्णाजी हलगेकर, खेमानी नाळकर, यलापा या नाळकर , बेबीताई भोसले, गणपती रा नाळकर, पांडुरंग भोसले ,संगिता रवळु नाळकर आदी उपस्थित होते.