IMG_20240907_095752

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी

सरकारी दवाखान्याच्या आवारात बांधण्यात आलेल्या नूतन एमसीएच हॉस्पिटलचे बुधवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जिल्हा आरोग्य विभाग कसून तयारीला लागला आहे.

एमसीएच हॉस्पिटल, नवे बस स्थानक आणि हेस्कॉम कार्यालयाचा जुलै महिन्यात उद्घाटन सोहळा निश्चित करण्यात आला होता. पण पावसाळी अधिवेशनामुळे हा सोहळा ऐनवेळी लांबणीवर टाकण्यात आला. त्यापैकी एमसीएच हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. एमसीएच हॉस्पिटलमध्ये ६० बेडची सोय असून ५० बेड बाळंतिणींसाठी आणि दहा बेड नवजात शिशुंसाठी सज्ज असणार आहेत. सर्व उपकरणे व सामग्रीही दाखल झाली आहे. ग्रुप डी आणि डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दोन डायलिसिस मशीन देखील उपलब्ध झाल्या असून त्यांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

100 बेडची उभारणार नूतन इमारत! 35 कोटीचा निधी मंजूर!

तालुका जनरल हॉस्पिटलची जुनी इमारत जीर्ण झाली आहे. नव्या जनरल हॉस्पिटलसाठी ३५.५० कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यातून १०० बेडची तीन मजली इमारत उभी राहणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून एमसीएच हॉस्पिटलचे ६० बेड आणि नियोजित सामान्य रुग्णालयाचे १०० बेड असे १६० बेड उपलब्ध होणार असून आरोग्य यंत्रणेचा कायापालट होणार अ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किवडसन्नवर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नारायण वड्डिन्नवर आदींनी एमसीएच हॉस्पिटलची पाहणी करून उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. दवाखान्याच्या परिसरात भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us