खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- गुरुवारी झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुरुवंदना कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील 7 प्राथमिक शाळातील शिक्षक शिक्षकांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये खानापूर तालुक्यातील मोदेकोप हायर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम. आर. पाटील यांना यंदाचा “तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. खानापूर येथील शुभम गार्डन मध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची माजी आमदार अरविंद पाटील, तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
- श्रीमती एम आर पाटील या एक प्रामाणिक शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी मुडेवाडी येथे पंधरा वर्षे तर नागुर्डा येथे सहा वर्षे प्रामाणिक सेवा बजावली आहे. सध्या त्या मोदेकोप येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये गेल्या नऊ वर्षापासून कार्यरत असून सध्या त्या मुख्याध्यापिका म्हणून म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या या तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्या कुपटगिरी येथील प्रतिष्ठित नागरिक व ज्योतिर्लिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक प्रभाकर पाटील यांच्या धर्मपत्नी होत.