IMG-20240903-WA0000

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून नंदगड हून मेरडा गावाकडे जात असताना हलसी जवळ एका भल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकीला अपघात झाल्याने माजी आमदार अरविंद पाटील यांचा वाहन चालक संतोष मादार वय 46 हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी के एल इ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याचा सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्यावर आज मंगळवारी सकाळी 11 वाजता मेरडा मुक्कामी अंत्यसंस्कार होणार आहे.

ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ, ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಅವರ ಚಾಲಕ ಸಂತೋಷ ಮಾದರ (46) ಅವರು ತಮ್ಮ ಬೈಕ್‌ನಲ್ಲಿ ನಂದಗಡದಿಂದ ಮೇರ್ಡಾ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾಗ ಹಲ್ಸಿ ಬಳಿಯ ದೊಡ್ಡ ಹೊಂಡದಲ್ಲಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಅಪಘಾತಕ್ಕೀಡಾಗಿ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಫಲಕಾ ರಿ ವಾಗಿಲಾ. ಸೋಮವಾರ ರಾತ್ರಿ 8:30ರ ಸುಮಾರಿಗೆ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂದು ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ನಡೆಯಲಿದೆ.

याबाबत मिळालेली माहिती की, संतोष हा शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मेरडा गावाकडे जात असताना नागरगाळी – कटकोळ या राज्य मार्गावरील हलसी इंदिरानगर कन्नड शाळेजवळ पडलेल्या एका भल्या मोठ्या खड्ड्यात त्याची दुचाकी गेल्याने तो त्या खड्ड्यात कोसळला व त्याच्या डोकीला गंभीर जखम झाली होती . अपघाताच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुनसान वातावरण होते. त्यामुळे गंभीर अवस्थेत पडलेल्या संतोषला कोणीही पाहिले नाही. त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन रात्रभर त्याच ठिकाणी विव्हळत पडला होता. दरम्यान रात्री चारच्या सुमारास एक वाहन त्या रस्त्याने जात असताना कोणीतरी अपघात मध्ये जखमी झाल्याचे निदर्शनाला आले. व त्याला तातडीने आरोग्य कवच ला बोलावून खानापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही व सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला . त्याच्या पश्चात वडील ,पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

ಈ ಬಗ್ಗೆ ದೊರೆತ ಮಾಹಿತಿ ಏನೆಂದರೆ, ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಸಂತೋಷ್ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನದಲ್ಲಿ ಮೇರ್ಡಾ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾಗ ನಾಗರಗಾಳಿ-ಕಟ್ಕೋಳ ರಾಜ್ಯ ರಸ್ತೆಯ ಹಲಸಿ ಇಂದಿರಾನಗರ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಬಳಿಯ ದೊಡ್ಡ ಹೊಂಡಕ್ಕೆ ಬೈಕ್ ಬಿದ್ದಿದೆ. ಮತ್ತು ಹೊಂಡಕ್ಕೆ ಬಿದ್ದು ತಲೆಗೆ ಗಂಭೀರ ಗಾಯಗಳಾಗಿವೆ. ಅಪಘಾತದ ವೇಳೆ ರಸ್ತೆಯ ಎರಡೂ ಬದಿ ನಿರ್ಜನವಾಗಿತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಚಿಂತಾಜನಕ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದ ಸಂತೋಷ್ ಅವರನ್ನು ಯಾರೂ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ರಾತ್ರಿಯಿಡೀ ಅದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ರಕ್ತದ ಮಡುವಿನಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ವಾಹನ ಹಾದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾಗ ಅಪಘಾತವಾಗಿ ಯಾರೋ ಗಾಯಗೊಂಡಿರುವುದು ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಮತ್ತು ತಕ್ಷಣ ಅವರನ್ನು ಆರೋಗ್ಯ ಕವಚಕ್ಕೆ ಕರೆಸಿ ಖಾನಾಪುರದ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕಳುಹಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ತೀವ್ರ ಗಾಯಗಳಿಂದ ಅವರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಮೃತರು ತಂದೆ, ಪತ್ನಿ, ಪುತ್ರ ಹಾಗೂ ಪುತ್ರಿಯನ್ನು ಅಗಲಿದ್ದಾರೆ.

संतोष परशराम मादार हा एक प्रामाणिक चालक म्हणून परिचित होता माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या वाहनांवर सतत गेली सात आठ वर्षे तो प्रामाणिकपणे सेवा कार्यरत होता. राजकारणाचा भाग काहीही असला तरी संतोष हा कधीही राजकीय बाब आपल्या मित्रत्वामध्ये न आणता सर्वांच्यात मिसळून राहणारा होता. त्याच्या आकस्मिक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एरवी खानापूर तालुक्याचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार अरविंद पाटील हे स्वतःच्या चालकाच्या अपघाताचे वेळी गावी नसणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. सदर अपघाताची बातमी कळताच युरोप दौऱ्यावर असलेले माजी आमदार अरविंद पाटील रविवारी सकाळी आपला दौरा अर्धवट करून विमानाने युरोप, दुबई, दिल्ली ते बेंगलोर हुन तातडीने बेळगावला दाखल झाले आहेत.

सच्चा मित्र हरपला .. माजी आमदार अरविंद पाटील

संतोष याचे जाणे हे मनाला चटका देणारे आहे. खानापूर तालुक्यात कोणत्याही ठिकाणी कधीही अपघात झाला तरी तातडीने धाव घेऊन त्याच्यावर उपचार केले पण स्वतःचाच वाहन चालक जेव्हा अपघातात जखमी झाला. तेव्हा दुर्दैवाने आपण या ठिकाणी नव्हतो. कदाचित या ठिकाणी आपण असतो तर हा प्रसंग घडलाच नसता, पण संतोष यांचे दुर्दैवी म्हणावे लागेल. झालेल्या या अपघातामुळे अतिव दुःख झाले आहे. एक सच्चा व प्रामाणिक चालक नव्हे तर मित्र हरवल्याची खंत माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जीव घेणे खड्डे ठरलेत अपघाताला निमंत्रण:

खानापूर तालुक्यात अनेक रस्ते हे जीव घेणे ठरले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महामार्गापासून सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जिल्हा पंचायत अगत्यात येणारे रस्ते ढसाळ झाले. नागरगाळी – कटकोळ या मार्गावरील नंदगड पर्यंत या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी अनेक वेळा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्षित आहे. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठूनही दुर्लक्ष झाले. त्यातच हा संतोष मादार यांचा झालेला अपघात त्याला कारणीभूत म्हणावा लागेल अशा या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वर मनुष्यबळाचा गुन्हा का दाखल करू नये असा सवाल उपस्थित होतो.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us