1000875430

विद्यानगर-शाहूनगर येथे सिद्धिविनायक सार्व. गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ

फोटो : खानापूर : मुहूर्तमेढ प्रसंगी ॲड ईश्वर घाडी, नारायण मयेकर, वासुदेव चौगुले, नारायण ओगले, राजाराम गुरव व इतर.

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

विविधतेतून एकता जपणारा आपला देश सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करतो. सण आणि उत्सवातूनही एकोप्याची भावना वाढीस लावण्याचे कार्य होते. सार्वजनिक गणेशोत्सवातून देखील हाच ऐक्याचा संदेश दिला जात आहे. या गौरवशाली परंपरेचे जतन होणे आवश्यक आहे असे मत वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांनी व्यक्त केले.
येथील स्टेशन रोडवरील विद्यानगर-शाहूनगर श्री. सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची मुहूर्तमेढ ॲड घाडी, मंडळाचे अध्यक्ष नारायण मयेकर, उपाध्यक्ष नारायण ओगले, पत्रकार वासुदेव चौगुले यांच्या हस्ते रोवण्यात आली. गजानन ओगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना अध्यक्ष मयेकर म्हणाले, मंडळाचे यंदाचे 29 वे वर्ष आहे. गणरायाची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा यासारखे उपक्रम राबवून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. शांत व शिस्तबद्ध मिरवणूक सोहळा ही मंडळाची खासियत असून पोलीस विभागाने उत्कृष्ट मंडळ म्हणून यापूर्वी सन्मान देखील केला आहे. यावर्षीही तीच परंपरा कायम ठेवली जाईल. यावेळी राजाराम गुरव, प्रकाश पाटील, परशराम पाटील, प्रकाश गवसेकर, संदीप शेमले, शौकत सनदी, रवी बडगेर आदि उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us