खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
सरकारी प्राथमिक शाळा ह्या प्रत्येकाच्या जीवनातील आत्मा आहे. सरकारी प्राथमिक शाळातून समृद्ध देशासाठी अनेक शुद्ध नागरिक घडले जीवनात यशस्वी होण्यासाठी प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी त्या शाळा जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. पण अलीकडे सरकारी प्राथमिक शाळाना व मातृभाषेतील शिक्षण याकडे लोकांचा कल कमी होत चालला आहे . इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे प्रत्येक पालकाचा कल असल्याने मातृभाषेतून शिकवल्या जाणाऱ्या या प्राथमिक शाळा ओस पडताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी बंद होत आहेत यासाठी या शाळा जिवंत ठेवायचा असेल तर ती प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मातृभाषेतील शिक्षण घेत उत्तम ज्ञानांकन मिळवता येते. यासाठी प्रत्येकाने आपल्या पाल्यांना मातृभाषेतील शिक्षणाकडे कल देऊन शिक्षित करावे यासाठी प्रत्येक पालकांनी गावातील नागरिकांनी आपली शाळा जगवण्यासाठी ‘एक पाऊल’ प्राथमिक शाळा कडे असा उपक्रम राबवावा असे आवाहन विश्वभारती क्रीडा संघटनेचे संस्थापक अनिल देसाई यांनी व्यक्त केले. सोमवार दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी मौजे चापगाव येथे सर्व सरकारी शाळा वाचवण्या आणि टिकवण्याबाबत पालक, कमिटी सदस्यांची कार्यशाळा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चापगाव मराठी शाळेचे एचडीएमसी अध्यक्ष मशनु चोपडे होते.
बोलताना विनोद गुरव हेबाळ यांनी पालक आणि एसडीएमसी कमिटी एकत्रित येऊन शाळेचे कार्यक्रम असो, खेळ असो शाळेची सुधारणा असो सर्वांनी हातभार लावून आणि एक विचाराने कार्य केले पाहिजे आणि आपल्या मुलांना घरापासून संस्कृती घडवण्याचा प्रयत्न पालकांनी करण्याचे आहे. निवृत्त शिक्षक सिताराम बेडरे यांनी आपापल्या गावांमध्ये पूर्वजांनी जी संस्कृती जपली आहे ती जपण्याचा प्रयत्न करून लहान मुलांना सर्व राष्ट्रीय सण असो या आपल्या आपल्या मातृभाषेचे सण असो हे संस्कार सांगून घडवण्याचे आहे आणि आपल्या शाळेबद्दल मुलांच्या मध्ये कौतुक करून सांगणे त्याचबरोबर मातृभाषेतून शिकवणे आज काळाची गरज आहे तरच आपल्या सर्व सरकारी शाळा टिकू शकतात. गंगाधर गुरव यांनी अनेक लोक एक विचाराचे जमतील आणि शाळा मातृभाषेतून शिक्षण मुलं घेतील त्यावेळेला हे कार्य व्यवस्थित पार पडते आणि जो या कार्यात जोडू शकतो तो विचार पटवून घेईल आणि त्यांना विचार वाटतील तोच या कार्यात कार्य करू शकतो आणि सर्वांनी मिळून मिसळून कार्य करावे असे सांगितले
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मष्णू चोपडे यांनी शाळा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक गावात विभागावर बैठका घेऊन जो उपक्रम विश्वभारती क्रीडा संघटनेने हाती घेतला आहे त्यांची त्यांनी कौतुक केले. या अभियान मध्ये विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष अनिल देसाई, महादेव पाटील, विनोद गुरव, पुंडलिक कुराडे, सिताराम बेडरे, गंगाधर गुरव एसडीएमसी अध्यक्ष चापगाव मसनू चोपडे , नम्रता ना पाटील, महादेव भाऊ पाटील, रूकमांना सो धबाले, अभिजीत पाटील, फोंडू कुराडे, गजानन पाटील, गणपती सुलगेकर , आरती सु पाटील ,सौ गंगू धबाले, सौ राजश्री र पाटील ,सौ माया संतोष धबाले ,त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक पाटील सातेरी कुराडे, वडेबैल एसडीएमसी अध्यक्ष मारुती पाटील अल्लेहोळ एसडीएमसी अध्यक्ष प्रवीण पाटील हडलगा, अध्यक्ष तथा सिंगिंनकोप अध्यक्ष अध्यक्ष ,झाडनावगे एसडीएमसी अध्यक्ष सदानंद गावडे, शिवाजी घाडी ,संजय ,अमर गुरव, आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते