*खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
सरकारी प्राथमिक शाळा हा प्रत्येकाचा पाया आहे. प्राथमिक व मातृभाषेतील शिक्षण हे जीवनाची दिशा देणारे ठरते यासाठी प्राथमिक सरकारी शाळा वाचवणे काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येक गावातील सरकारी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्नांची फराकष्टा करून लोकांना जागृत करण्यासाठी विश्वभारती क्रीडा संघटनेने उपक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने श्रावण सोमवार दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता चापगाव येथे पालक व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पालक शिक्षक एसडीएमसी कमिटी गावा शहरा जागा हो सरकारी शाळा वाचवा हो विश्वभारती कला क्रीडा संघटनेचा धागा हो! शिक्षण आणि खेळाच्या बाबतीत पालकांनी आपल्या मुलांना आणि आपल्या शाळांना प्राधान्य देणे हे महत्त्वाचे आहे. संकल्पनेमध्ये ज्याला हा विचार पटतो तोच व्यक्तीआपली भाषा आपली शाळा जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रयत्न करतो
*मातृभाषेतून शिकलेला मुलगा उच्च स्तरावर जाऊ शकतो त्यामुळे एसडीएमसी कमिटीने एकीने काम करून शाळांची सुधारणा करूया असे विचार यायला हवे असे मत संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी व्यक्त केले आहे.