खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील कुपटगिरी येथील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारे देवस्थान म्हणजे भावकेश्वरी देवस्थान होय गावच्या पूर्वेला व लेला साखर कारखान्याच्या दक्षिण भागात उंच टेकडीवर पांडवकालीन वसलेले देवस्थानं होय.
या मंदिराचा जिर्णोद्धार् करण्याचे काम ग्रामस्थ कमिटीने हाती घेतले असून मंदिराचे कामही प्रगतीपथावर आहे सध्या मंदिराचा भरण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून या सिटीला अनेक देणगीदारांकडून देण्याचा वर्षाव होताना दिसतो आहे. या मंदिराच्या पुढील कामासाठी गावातील भावकेश्वरी सैनिक संघटना कुपटगिरी या संघटनेने आज आपल्या गावच्या मंदिरासाठी एक लाख तीस हजार रुपये (1.30000 )रोख चेक दिला आहे तरी त्या संघटनेचे आपल्या गावामार्फत व कुपटगिरी पंच कमेटी बांधकाम कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी आजी-माजी सैनिक, संजय रामचंद्र पाटील, प्रताप पाटील, सुनील भाऊसाहेब पाटील, तुकाराम हणमंत पाटील, दुधाप्पा बाबाजी पाटील, राजेंद्र देवाप्पा पाटील, भाऊ रवळु पाटील, प्रभाकर भाऊराव पाटील, कलाप्पा धनाजी पाटील, मंदिर बांधकाम कमिटी अध्यक्ष शंकर बाळाराम पाटील, सेक्रेटरी संभाजी बाबाजी पाटील, उपाध्यक्ष कल्लापा शामराव पाटील, गंगाराम अण्णाप्पा पाटील, तसेच सैनिकांच्या माता, पत्नी, मुलं उपस्थित होते.