खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश पदी न्यायमूर्ती चंद्रशेखर तळवार यांची नियुक्ती झाली आहे. या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची जागा गेल्या अडीच महिन्यापासून रिक्त होती. त्यामुळे खानापुरातील अनेक वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे कामकाज बेळगाव या ठिकाणी करावे लागत होते. त्यामुळे पक्षकार तसेच वकील वर्गाची मोठी अडचण होत होती. अखेर खानापूरच्या जेएमएफसी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदी न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्याने येथील समस्या दूर झाली आहे.
सोमवार दि.१२ ऑगष्ट रोजी खानापूर वरिष्ठ स्तर न्यायालयामध्ये चंद्रशेखर तलवार याची न्यायाधीश पदी नियुक्ती होत आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.यावेळी खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य न्यायाधिश ज्यूनियर डिव्हिजन विरेश हिरेमठ उपस्थित होते. प्रारंभी अँड एस. के. नंदगडी यानी प्रास्तविक केले. यावेळी चंद्रशेखर तलवार यानी सर्वतोपरी बार व बेंच यामध्ये समन्वय राखुन जलदन्याय देण्याबदल सांगीतले.
यावेळी व्हा प्रसिंडेट के सी कळेकर, सेक्रेटरी, एम वाय कदम, एच.एन देसाई, आर एन देसाई, पी.एन बाळेकुंद्री, एस एन भोसले, आर एम हिरेमठ, पी वाय पाटील, एस आर. तारीहाळ, एम टी हेरेकर, एस एम होंगल, पुष्पा मादार, विजय हिरेमठ, आदी उपस्थित होते. आभार AD लोकरे यांनी मांडले.