खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
जीवनात ध्येय निश्चित करताना इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा मला काय बनायचे आहे त्याकडे लक्ष द्यावे व नेहमी सकारात्मक विचार करावा. जीवनात नेहमी उच्च ध्येय ठेवावे तरच आपण ध्येयापर्यंत पोहचू शकतो आपण जर वेळेला जपलं तर वेळ आपल्याला जपते हा मंत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा असा कानमंत्र खानापूर येथील मास्टर ब्रेन डिट संस्थेचे मोटीवेशनल स्पीकर श्री संदीप देशमुख यांनी मणतुर्गा हायस्कुल येथे आयोजित विशेष प्रेरणादायी व्याख्यान मालेत केले.
खानापूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कुल मणतुर्गा मध्ये शाळेचे हितचिंतक श्री अरविंद महादेव राव शेलार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी ब्रेन डिट संस्थेचे वक्ते श्री संदीप देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री जे. एम. पाटील यांनी श्री संदीप देशमुख व श्री अरविंद महादेवराव शेलार यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एल सुतार यांनी केले.