खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात शालेय मुलांना उत्तम शिक्षणाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी. यासाठी कला क्रीडा योगासन सांस्कृतिक कार्यक्रम जपण्यासाठी आपल्या मातृभाषा असलेल्या शाळाच लाभदायी ठरतात. पण आज काल मातृभाषेतील शाळांच्या कडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. यासाठी सरकारी शाळा वाचवा अभियान राबवण्यासाठी खानापूर तालुका विश्वभारती कला क्रीडा संघटना उपसखा खानापूर यांच्यावतीने एक दिवसीय अभियानाचे आयोजन उद्या रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता खानापूर येथील इस्कॉन मंदिर मलप्रभा नदी घाट या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी खानापूर तालुक्यातील मराठी, उर्दू तथा कन्नड शाळातील सर्व पालक वर्ग, शाळा सुधारणा कमिटी व शिक्षण प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखा खानापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.