IMG-20240801-WA0025


खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

खानापूर तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे तर अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन मोठे नुकसान होत आहे. रात्रभर झालेल्या धुवाधार पावसामुळे माडीगुंजी ते किरावळे, आंबेवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर सकाळपासून पाणी आल्याने या गावाला बेटाचे स्वरूप आले आहे सकाळपासून वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. शिवाय कापोली हालसाल नाल्यावर ही पूर आल्याने या गावांना जोडणारा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. जोराचा पाऊस सुरू असल्याने परिसरातील लोकांना गावाबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
गुरुवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. कणकुंबी येथे 133 मिलिमीटर तर खानापूर येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिवाय बिडी येथे 66 लोंढा येथे 86 जांबोटी येथे 80 असोगा येथे 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे शिवाय बिडी येथे 66 लोंढा येथे 86 जांबोटी येथे 80 असोगा येथे 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मला प्रभा नदी दुथडी वाहत आहे नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत.

कापोली – हालसाल रस्त्यावर आलेले पाणी…

आंबेवाडी रस्त्या वरील आल्यावर आलेले पाणी

शिंदोळीत घर कोसळून ढिगार्‍यात दगावलेली गाय …


तालुक्यातील ढोकेगाळी येथे रात्री विष्णू बाबुराव गोरल यांचे राहते घर कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शिंदोळी येथे एक घर कोसळून त्यामध्ये कृष्णा साताप्पा घाडी यांची एक गाय दगावल्याचा प्रकार घडला आहे. तर दोन गाई जखमी झाले आहेत. अशा प्रकारे अनेक ठिकाणी रात्री घरांची पडझड झाल्याची नोंद झाली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us