खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- बेळगाव पणजी वाया चोरला या मार्गावरील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता या मार्गावरील अवजड वाहतूक गेल्या चार-पाच दिवसापासून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी दिले आहेत. कणकुंबी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिज कमकुवत झाला आहे. शिवाय चोरला घाटात रस्त्याची दैनी अवस्था व दरड कोसळण्याचे प्रकार पाहता अवजड वाहनांना प्रवेश निर्बंध चा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. तरीही या मार्गावरून चोरट्या पद्धतीने अवजड वाहने सुरूच आहेत. अवजड वाहनांना बंदी असताना आज एक अवजड वाहन गोव्याच्या दिशेने जात असताना एका सुसाट अवजड ट्रक चालकाने मोरीला जोराची धडक दिल्याने चालकाचे नियंत्रण तुटून सदर ट्रक पूर्णतः खोल नाल्यात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून या वाहनांना प्रवेश दिलास कुणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यांची वाताहात झाली आहे. चोर्लां घाटात रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी अवजड वाहनांना अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. सोमवारी दुपारी जांबोटी हुन गोव्याच्या दिशेने जाणारा एक फरशी वाहू ट्रक चालकाचे एका वळणावरील नियंत्रण तुटले व त्याने थेट नाल्याच्या मोहरीलाच जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रक नाल्यातच पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रक मधील चालक व क्लीनर बालाबाल बचावले असून त्यांना किरकोळ जखम झाल्याचे समजते . ट्रक मधील फरशी चक्काचूर झाली आहे.