खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यात जोराचा पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड जोरात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गोरगरिब आश्रय हीन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खानापूर तालुक्यातील मंतुरगा येथील एका घराची भिंत ढासळली. सदर भिंत बाजूला असलेल्या मंदिरावर पडल्याने मंदिराचेही मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
- ह्याबाबत मिळालेली माहिती की मंतुरगा येथील श्री प्रकाश रावबा देवकरी यांचे जुने राहते घर मंदिराच्या बाजूस आहे. पण सदर घराची भिंत गळतीमुळे कोसळल्याने बाजूला असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे संपूर्ण छत जमीन दोस्त झाल्याने देवारा उघड्यावर पडला आहे. एकीकडे गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले असताना गावच्या मंदिराचेही नुकसान झाले आहे. यासाठी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी करून सदर देवकरी कुटुंबाला तसेच मंदिराच्या जीर्णोदरासाठी निधी उभा करावा अशी मागणी केली जात आहे.