खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात सततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी बेळगाव पणजी व्हाया चोर्ला (राज्य महामार्ग 54) मार्गावरील कुसमळी पूल कमकुवत झाल्याने तसेच खानापूर जांबोटी मार्गावरील (राज्य मार्ग 31) शंकरपेट चढावाजवळ रस्ता सुयोग्य नसल्याने या दोन्ही मार्गावरून जांबोटी मार्गे गोव्याला जाणाऱ्या व येणाऱ्या अवजड वाहनांना (malti Exal Vehicle) निर्बंध घालण्यात आले आहेत. असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.
दोनच दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली व या पाणी नंतर सदर दोन्ही आदेश जारी केले आहेत. कसमळी नजीकचा पूल कमकुवत झाल्याने या मार्गावरून अवजड वाहतूक जाणे कठीण बनले आहे. शिवाय शंकरपेट चढावाजवळ ही रस्त्याची परिस्थिती गंभीर असल्याने हे दोन्ही रस्ते वाहतुकीस धोकादायक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आले. यामुळे या दोन्ही रस्त्यावरील मल्टी एक्सेल व्हेईकल वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी असा आदेश बजावला आहे. यासाठी पर्यायी म्हणून बेळगाव खानापूर- आळणावर- यल्लापूर मार्गे गोव्याला येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांना सोईचा होईल असेही आदेशात म्हटले आहे.